शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
इलॉन मस्क यांनी पुन्हा केलं चकित, स्टारशिप यानातून अवकाशात पाठवली केळी; केला अभूतपूर्व प्रयोग
7
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
8
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
9
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
10
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
11
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
12
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
13
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
14
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
15
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
17
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
18
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
19
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
20
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार

‘लोकमत’चा अंदाज अचूक; भाजप आणि गणेश नाईकांचे प्रवेशावेळी शक्तिप्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2019 1:58 AM

बुधवारी मुख्यमंत्र्यांसह नेते राहणार हजर

नवी मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशासाठी ११ सप्टेंबरचा मुहूर्त ठरल्याचे रविवारी अधिकृतपणे जाहीर झाले. याबाबतचे वृत्त लोकमतने रविवारच्याच अंकात प्रसिद्ध केले होते. वाशीच्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये सायंकाळी ५ वाजता नाईक आपल्या समर्थकांसह भाजपात दाखल होतील.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार असल्याची माहिती संजीव नाईक यांनी ‘लोकमत’ला दिली.

गणेश नाईक हे नवी मुंबईचे नव्हे, तर पूर्वीच्या अखंड ठाणे जिल्ह्याचे आणि नवी मुंबईशी जोडलेल्या रायगडचेही नेते असल्याचे दाखवून देण्यासाठी ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील त्यांच्या समर्थकांचे मोठे शक्तीप्रदर्शन केले जाईल. या कार्यक्रमाला ठाणे, पालघर, रायगडमधील भाजपचे आमदार-खासदारांना बोलावून भाजपही आपली ताकद दाखवून देण्याच्या तयारीत आहे.

नाईक यांच्या भाजप प्रवेशाची महिनाभरापासून चर्चा सुरू आहे. संदीप नाईक यांनी आमदारकीचा राजीनामा देत माजी महापौर सागर नाईक, माजी उपमहापौर भरत नखाते यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांसमवेत यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे नाईक स्वत: भाजपमध्ये केव्हा प्रवेश करतात, याकडे सर्वांचे लक्ष होते. त्यासाठी अगोदर ९ सप्टेंबरचा मुहूर्त निश्चित करण्यात आला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांची वेळ न मिळाल्याने तो पुढे ढकलून ११ सप्टेंबरचा मुहूर्त निश्चित करण्यात आला. यावेळी गणेश नाईक यांच्यासह त्यांचा मोठा मुलगा माजी खासदार संजीव नाईक हे भाजपत प्रवेश करतील. याखेरीज ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आजी-माजीनगरसेवक व राष्ट्रवादीचे जिल्हा पदाधिकारी, विविध समित्यांचे सभापती भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे संजीव नाईक म्हणाले.महापालिकेत सत्तांतरनाईक यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याने नवी मुंबई पालिकेतील राष्ट्रवादीची सत्ताही जाणार हे निश्चित झाले. सोमवारी राष्ट्रवादीचे ५५ नगरसेवक कोकण आयुक्तांकडे जाऊन वेगळा गट स्थापन करतील, सांगितले जाते. या वेगळ्या गटात नक्की किती नगरसेवक सहभागी हातील, याबाबत संभ्रम आहे. यासंदर्भात संजीव नाईक यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी उत्तर देणे टाळले.

टॅग्स :BJPभाजपाGanesh Naikगणेश नाईक