नवी मुंबई: राज्यात अनेकविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार असल्याचे अनेक दावे यापूर्वीही करण्यात आले आहेत. यातच आता भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईतील एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, राजकीय चर्चांना सुरुवात झाल्याचे सांगितले जात आहे. आम्हाला पुन्हा सत्तेची संधी मिळणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. (bjp devendra fadnavis said in mathadi workers program that we will get back in ruling)
मला त्रास देणाऱ्यांचा निर्णय जनतेच्या कोर्टात: छगन भुजबळ
अण्णासाहेब पाटील यांच्या ८८व्या जयंतीनिमित्त माथाडी कामगारांचा मेळावा नवी मुंबईत आयोजित करण्यात आला होता. यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थिती न लावल्यामुळे नरेंद्र पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. माथाडी कामगारांच्या प्रश्नावर राजकारण न करण्याचे आवाहन नरेंद्र पाटील यांनी केले.
आरोग्य विभागाच्या परीक्षेतील गोंधळाला महाविकास आघाडी सरकारच जबाबदार; भाजपची टीका
आमचे सरकार असताना माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवले
आमचे सरकार असताना माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवले, पुन्हा आम्हाला संधी मिळणारच आहे, तेव्हा उरलेले प्रश्नही सोडवू, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. माथाडींच्या चळवळीसाठी आमच्या काळात सरकारचे दरवाजे आम्ही पूर्णपणे उघडे केले होते. माथाडी नेत्यांनी कधीही प्रश्न मांडले की आम्ही ते सोडवायचो, अशी व्यवस्था आम्ही उभी केली होती. पुढचा काळ मिळाला असता, तर उरलेले प्रश्नही सोडवले असते, असे फडणवीस यांनी सांगितले.
“विद्यार्थ्यांकडे १० ते १५ लाखांची मागणी, दलाल घुसल्यामुळेच परीक्षा रद्द”; फडणवीसांचा मोठा आरोप
नरेंद्र पाटील यांच्यामुळे या चळवळीचे महत्त्व समजले
कामगारांचे प्रश्न हे पक्षाच्या पलिकडे पाहायचे असतात. त्यामुळे या चळवळीतील सर्व नेत्यांना जवळ करण्याचे काम आम्ही केले होते, असे सांगतानाच माथाडी कामगार चळवळीची मला सखोल माहिती नव्हती. मात्र, नरेंद्र पाटील यांच्या संपर्कात आल्यानंतर मला या चळवळीचे महत्त्व समजलं. गरिबातल्या गरिबाच्या श्रमाला सन्मान मिळवून देण्याचे काम या चळवळीने केले आहे, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले.
दरम्यान, या सरकारला आता माथाडींचे प्रश्न सोडवण्याची संधी आहे, तेही सोडवतील असा मला विश्वास आहे. नाही सोडवले, तर आम्हाला पुन्हा संधी मिळणार आहे. तेव्हा आम्ही ते प्रश्न सोडवू. तीही अडचण नाही. लोकशाहीमध्ये कमी-अधिक होत असते. कधी हे असतात, कधी ते असतात. पण कामगारांचे प्रश्न पक्षाच्या पलीकडे जाऊन पाहायला हवेत, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.