शहरं
Join us  
Trending Stories
1
BRICS परिषदेसाठी PM नरेंद्र मोदी रशियाला रवाना; चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्याशी होणार चर्चा?
2
नांदेड शहर आणि परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के, जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राची माहिती
3
मनसेची पहिली यादी आज? अमित ठाकरे, नांदगावकर, देशपांडे, जाधव यांची नावे निश्चित?
4
आजचे राशीभविष्य: स्त्रियांशी काळजी पूर्वक व्यवहार करावेत, पैसा आणि कीर्ती यांची हानी संभवते
5
मिका सिंगने कॉन्सर्टदरम्यान सलमानला धमकी देणाऱ्यांची केली बोलती बंद! म्हणाला- "भाई तू..."
6
उमेदवार यादीआधीच १७ जणांना एबी फॉर्म; अजित पवार गट उद्या जाहीर करणार यादी
7
१७० खोल्यांचं घर, ₹२०००० कोटींची संपत्ती; कोण आहेत जगातील सर्वात मोठ्या घराचे मालक समरजीतसिंह गायकवाड
8
बहिणीसाठी धारावीच्या जागेचा गायकवाडांचा आग्रह; नेत्यांचे म्हणणे- कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या!
9
मनसेला महायुतीचा पाठिंबा मिळण्याची चर्चा; मतांचे विभाजन होऊ नये यासाठी सारेच प्रयत्नशील
10
फडणवीस-ठाकरे कथित भेटीच्या चर्चेचा धुरळा; काँग्रेस-उद्धवसेना म्हणते, यात तथ्य नाही!
11
११ आमदारांचे मताधिक्य ‘नोटा’पेक्षाही होते कमी; २०१९ विधानसभा निवडणुकीत काय घडलं होतं?
12
जागावाटप अन् नाराजीनाट्याचा पहिला अंक! महायुतीत धुसफुस, महाविकास आघाडीत दिलजमाई
13
भाजपाने नाकारले; संदीप नाईक यांच्या हाती तुतारी; वाशीत आज शरद पवार गटात जाहीर प्रवेश?
14
LAC वर गस्त घालणार, भारत-चीनमध्ये करार; मोदी-जिनपिंग यांच्यात चर्चा होण्याची शक्यता
15
महायुतीतर्फे मुंबईत सात, तर मविआ देणार तीन महिला; शरद पवार गटातून कुणीही नाही?
16
जिल्ह्यातील ओबीसी नेता अशा ओळखीमुळे किसन कथोरे यांना पुन्हा संधी; सूत्रांची माहिती
17
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आज उघडणार दालनाचे द्वार! २९ ऑक्टोबरपर्यंत निवडणुकीची प्रक्रिया
18
कल्याण पूर्व विधानसभा: भाजपच्या सुलभा गायकवाड यांना शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध
19
पुणे बंगळुरू हायवेवर खासगी वाहनात सापडली कोट्यवधीची रोकड; सत्ताधारी आमदाराकडे बोट?
20
आमदार चंद्रकांत पाटलांचा CM एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

भाजपने चारही आमदारांवर पुन्हा दाखविला विश्वास; पहिल्याच यादीत जाहीर केली नावे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 12:11 PM

भारतीय जनता पक्षाने पहिल्या यादीमध्ये नवी मुंबई, पनवेल, उरणमधील चारही मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदारांवर विश्वास दाखविला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: भारतीय जनता पक्षाने पहिल्या यादीमध्ये नवी मुंबई, पनवेल, उरणमधील चारही मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदारांवर विश्वास दाखविला आहे. त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार, या तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे.

भाजपच्या पहिल्या यादीत ऐरोलीमध्ये गणेश नाईक, बेलापूरमध्ये मंदा म्हात्रे, पनवेलमध्ये प्रशांत ठाकूर  व उरणमध्ये महेश बालदी यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. निवडणुकांची चाहूल लागल्यापासून इच्छुक उमेदवारांमध्ये चुरस निर्माण झाली होती. ऐरोली व बेलापूरमध्ये शिंदेसेनेनेही दावा केला होता. याशिवाय बेलापूरमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी उमेदवारी मागितली होती. यामुळे पक्ष विद्यमान आमदारांना उमेदवारी देणार की जिल्हा अध्यक्षांना  पसंती दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर पक्षाने विद्यमान आमदारांवर विश्वास दाखवून त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

२००९ पूर्वी नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरामध्ये भाजपचे फारसे अस्तित्व नव्हते. चारपैकी एकही आमदार पक्षाचा नव्हता. २०१४ च्या निवडणुकीमध्ये बेलापूरमधून मंदा म्हात्रे व उरणमधून प्रशांत ठाकूर विजयी झाले. २०१९ च्या निवडणुकीमध्ये तीन मतदारसंघांमध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार व उरणमध्ये भाजप समर्थक महेश बालदी निवडून आले. सिडको कार्यक्षेत्रामधील या चारही मतदारसंघांमध्ये यावेळेस पुन्हा पक्षाने विद्यमान लोकप्रतिनिधींना तिकीट दिले असून, यामुळे अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४panvel-acपनवेलairoli-acऐरोलीbelapur-acबेलापूरuran-acउरणthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024Ganesh Naikगणेश नाईकManda Mhatreमंदा म्हात्रेPrashant Thakurप्रशांत ठाकूर