भाजपा-आरपीआयचे अर्ज दाखल

By admin | Published: February 5, 2017 02:56 AM2017-02-05T02:56:36+5:302017-02-05T02:56:36+5:30

भारतीय जनता पार्टी-आरपीआय युतीने पनवेल तालुक्यात हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने जोरदार शक्तिप्रदर्शन व जयघोष करीत शनिवार उमेदवारी अर्ज दाखल करून

BJP-RPI filed for application | भाजपा-आरपीआयचे अर्ज दाखल

भाजपा-आरपीआयचे अर्ज दाखल

Next

पनवेल : भारतीय जनता पार्टी-आरपीआय युतीने पनवेल तालुक्यात हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने जोरदार शक्तिप्रदर्शन व जयघोष करीत शनिवार उमेदवारी अर्ज दाखल करून जिल्हा परिषद व पंचायत समितीवर झेंडा फडविण्यासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले.
रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश महेता, माजी खासदारे रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारांनी प्रांत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर केले. पनवेल तालुका व शहर भाजपाच्या मध्यवर्ती कार्यालयात महापुरूषांच्या पुतळयास अभिवादन करून उमेदवारांच्या रॅलीला ढोलताशाच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत सुरुवात झाली.
मिरवणूकीत भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र येरूणकर, तालुकाध्यक्ष अरूणशेठ भगत, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, शहर अध्यक्ष जयंत पगडे, युवानेते परेश ठाकूर, माजी नगराध्यक्षा चारूशिला घरत, राज्य परिषद सदस्य सी. सी. भगत, पंढरीशेठ फडके, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा कल्पना राऊत, माजी तालुकाध्यक्ष तानाजी खंडागळे , जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य एकनाथ देशेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, शहर सरचिटणीस नितीन पाटील, गणेश पाटील, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बिनेदार, तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, प्रल्हाद केणी, शहर अध्यक्षा मुग्धा लोंढेसह हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
पनवेल तालुक्यात गव्हाण, गुळसुंदे, वावंजे, नेरे, वडघर, केळ वणे, पालीदेवद, पळस्पे या आठ जिल्हा परिषद व वांवजे, चिंध्रण, नेरे, आदई, पालीदेवद, विचुंबे, पळस्पे, कोन, पोयंजे, गुळसुंदे, करंजाडे, वडघर, वहाळ, गव्हाण, केळवणे, आपटा या सोळा पंचायत समितींचा समावेश आहे.

सन्मानाने युती करणार होतो मात्र ती झाली नाही. परंतु रायगडच्या जनतेचा कल भाजपकडे आहे. जिल्हापरिषद आणि पंचायत समिती भाजपने जिंकल्या कि रायगड जिल्हा महाराष्ट्रात नंबर एक होणार यात शंकाच नाही.
- प्रकाश महेता,
पालकमंत्री रायगड

भाजप हा विकासावर भर देणारा पक्ष आहे. शेकाप इतर पक्षाशिवाय उभे राहू शकत नसल्याने त्यांनी महाआघाडी स्थापन केली आहे. पनवेल पंचायत समिती, जिल्हापरिषद ताब्यात घेऊ.
- रामशेठ ठाकूर,
माजी खासदार

विकासकामांच्या माध्यमातून भाजप आगेकूच करीत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकणारच. त्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे.
- प्रशांत ठाकूर,
आमदार

जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल
हेमंत नामदेव ठाकूर (गव्हाण), विनोद सदाशिव साबळे (गुळसुंदे), अमति मोहन जाधव (पाली देवद), लिना राजेंद्र पाटील (पळस्पे), ठकीबई शंकर वाघे (वडघर)

Web Title: BJP-RPI filed for application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.