शहरं
Join us  
Trending Stories
1
Mahayuti: "रामटेकमध्ये जयस्वाल नकोच, महायुतीने दुसरा उमेदवार द्यावा"
2
आज माझं कुटुंब कोसळलं आहे, पण...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दिकींनी काय आवाहन केलं?
3
इस्रायलच्या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवार ठार; 3 महिन्यांत 3 मोठे शत्रू संपवले
4
'जुन्या गोष्टी विसरुन भविष्याकडे वाटचाल करा', भारत-पाक संबंधांवर नवाझ शरीफ स्पष्ट बोलले
5
"वरोराची जागा भाजपलाच हवी, अन्यथा...", पक्षाला इशारा, इच्छुक धडकले कार्यालयात
6
सरकारनं खेळाडूंची बक्षिसं दिली नाहीत, विश्वविजेत्या संघातील काहींशी चर्चा झाली; आव्हाडांचा दावा
7
"तुमच्यात धमक असेल, तर..."; प्रवीण दरेकरांचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान
8
'या खुर्चीने दगा दिला ऐसा की...'; शिंदेंच्या सेनेने ठाकरेंना व्यंगचित्रातून डिवचलं
9
IPL 2025: काव्या मारन खेळणार मोठा डाव; पॅट कमिन्स नव्हे, 'हा' स्टार क्रिकेटर खाणार जास्त 'भाव'
10
विधानसभेला भाजपचे प्रभाकर पाटील 'घड्याळ' हातात बांधणार?; महायुतीत हालचाली गतीमान; लवकरच शिक्कामोर्तब!
11
दोन महिन्यांपासून ठावठिकाणा नाही, शेख हसिना आहेत कुठे? समोर आली अशी माहिती
12
INDW vs NZW : टीम इंडियाची घोषणा! हरमनबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम; रिचा १२वी बोर्ड परीक्षेमुळे मुकणार
13
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी प्रवासी बसची टेम्पोला धडक; अपघातात २३ जण जखमी 
14
१८०० वर इच्छुकांसोबत आज केवळ चर्चा, निर्णय अंतिम बैठकीत समाज घेणार: मनोज जरांगे
15
पुन्हा रेल्वे अपघात, लोकमान्य टर्मिनल एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; आसाममध्ये रेल्वे सेवा विस्कळीत
16
माजी खासदार संभाजीराजेंचा मोठा गौप्यस्फोट; "लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हायकमांडनं..."
17
VIDEO: इम्तियाज जलील यांची घोषणा; विधानसभेसह नांदेड लोकसभा पोटनिवडणूकही लढवणार
18
IND vs NZ : भारताची लाजिरवाणी कामगिरी; रोहितकडून मोठ्या चुकीची प्रामाणिक कबुली, म्हणाला...
19
'मिट्टी में मिला देंगे...', उत्तर प्रदेशातील 'योगी'राजमध्ये सात वर्षात 12 हजार एन्काउंटर
20
"कॅनडाला प्रत्यार्पणसाठी २६ जणांची यादी पाठवली, लॉरेन्स टोळीच्या..." भारताने ट्रुडोंना पुन्हा सुनावले

भाजपा-आरपीआयचे अर्ज दाखल

By admin | Published: February 05, 2017 2:56 AM

भारतीय जनता पार्टी-आरपीआय युतीने पनवेल तालुक्यात हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने जोरदार शक्तिप्रदर्शन व जयघोष करीत शनिवार उमेदवारी अर्ज दाखल करून

पनवेल : भारतीय जनता पार्टी-आरपीआय युतीने पनवेल तालुक्यात हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने जोरदार शक्तिप्रदर्शन व जयघोष करीत शनिवार उमेदवारी अर्ज दाखल करून जिल्हा परिषद व पंचायत समितीवर झेंडा फडविण्यासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश महेता, माजी खासदारे रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारांनी प्रांत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर केले. पनवेल तालुका व शहर भाजपाच्या मध्यवर्ती कार्यालयात महापुरूषांच्या पुतळयास अभिवादन करून उमेदवारांच्या रॅलीला ढोलताशाच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत सुरुवात झाली. मिरवणूकीत भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र येरूणकर, तालुकाध्यक्ष अरूणशेठ भगत, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, शहर अध्यक्ष जयंत पगडे, युवानेते परेश ठाकूर, माजी नगराध्यक्षा चारूशिला घरत, राज्य परिषद सदस्य सी. सी. भगत, पंढरीशेठ फडके, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा कल्पना राऊत, माजी तालुकाध्यक्ष तानाजी खंडागळे , जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य एकनाथ देशेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, शहर सरचिटणीस नितीन पाटील, गणेश पाटील, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बिनेदार, तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, प्रल्हाद केणी, शहर अध्यक्षा मुग्धा लोंढेसह हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. पनवेल तालुक्यात गव्हाण, गुळसुंदे, वावंजे, नेरे, वडघर, केळ वणे, पालीदेवद, पळस्पे या आठ जिल्हा परिषद व वांवजे, चिंध्रण, नेरे, आदई, पालीदेवद, विचुंबे, पळस्पे, कोन, पोयंजे, गुळसुंदे, करंजाडे, वडघर, वहाळ, गव्हाण, केळवणे, आपटा या सोळा पंचायत समितींचा समावेश आहे. सन्मानाने युती करणार होतो मात्र ती झाली नाही. परंतु रायगडच्या जनतेचा कल भाजपकडे आहे. जिल्हापरिषद आणि पंचायत समिती भाजपने जिंकल्या कि रायगड जिल्हा महाराष्ट्रात नंबर एक होणार यात शंकाच नाही. - प्रकाश महेता, पालकमंत्री रायगड भाजप हा विकासावर भर देणारा पक्ष आहे. शेकाप इतर पक्षाशिवाय उभे राहू शकत नसल्याने त्यांनी महाआघाडी स्थापन केली आहे. पनवेल पंचायत समिती, जिल्हापरिषद ताब्यात घेऊ.- रामशेठ ठाकूर, माजी खासदारविकासकामांच्या माध्यमातून भाजप आगेकूच करीत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकणारच. त्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे. - प्रशांत ठाकूर, आमदार जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखलहेमंत नामदेव ठाकूर (गव्हाण), विनोद सदाशिव साबळे (गुळसुंदे), अमति मोहन जाधव (पाली देवद), लिना राजेंद्र पाटील (पळस्पे), ठकीबई शंकर वाघे (वडघर)