- वैभव गायकर
पनवेल : महाराष्ट्र प्रदेश भाजपाची प्रदेश कार्यकारिणी बैठक २३ जुलैला पनवेलमध्ये होणार आहे. प्रदेश कार्यकारिणी निमित्त भाजपचे सर्व आमदार, महत्वाचे पदाधिकारी या बैठकीला हजर राहणार आहेत. राज्यात झालेल्या सत्ताबदलात राज्याचे राजकारण पूर्णपणे बदलले असून भाजप सत्तेत सहभागी झाल्याने या बैठकीला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.
या बैठकीला भाजपाची ८०० प्रदेश कार्यकारिणी बैठक भाजपचे पदाधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या बैठकीत माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार राजकीय प्रस्ताव मांडणार आहेत. यामध्ये ओबीसी राजकीय आरक्षण परत मिळविल्याबद्दल प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे भाजप-शिवसेना सरकारच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडतील.
याचबरोबर, शेतीविषयक प्रस्ताव भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे मांडतील. दिवसभर चालणार्या या बैठकीत राजकीय सद्यस्थितीविषयी चर्चा होईल तसेच आगामी कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, अशीही माहिती केशव उपाध्ये यांनी दिली.