आयुक्तांच्या समर्थनार्थ आयोजित बैठकीत भाजपाचा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 02:42 AM2018-03-18T02:42:38+5:302018-03-18T02:42:38+5:30
पनवेल महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी सामाजिक संघटनांनी शुक्रवारी तथास्तु सभागृहात बैठकीचे आयोजन केले होते. या सभेमध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घालून सभा उधळण्याचा प्रयत्न केला. सत्ताधाºयांच्या या भूमिकेमुळे ज्येष्ठ नागरिकांसह सामाजिक संस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पनवेल : पनवेल महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी सामाजिक संघटनांनी शुक्रवारी तथास्तु सभागृहात बैठकीचे आयोजन केले होते. या सभेमध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घालून सभा उधळण्याचा प्रयत्न केला. सत्ताधाºयांच्या या भूमिकेमुळे ज्येष्ठ नागरिकांसह सामाजिक संस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आयुक्तांच्या समर्थनार्थ जनतेचा विश्वासदर्शक ठराव या कार्यक्र माचे २१ मार्चला मिडलक्लास हाऊसिंग सोसायटीच्या मैदानावर आयोजन करण्यात आले आहे. विविध सामाजिक संस्था मिळून या कार्यक्रमाचे आयोजन करीत आहे . या कार्यक्र माच्या चर्चेकरिता नियोजित बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी तसेच शेकाप, काँग्रेस व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्र माच्या सुरूवातीला कार्यक्रमाची रूपरेषा सांगत आयोजकांनी उपस्थित सर्व पक्षाच्या मान्यवरांना व्यासपीठावर बसण्यास सांगितले. यामध्ये व्यासपीठावर कांतीलाल कडू, अरुण भिसे, महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, शेकापचे जिल्हाप्रमुख गणेश कडू, नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर, नगरसेविका प्रीती जॉर्ज, हरेश केणी आदींचा समावेश होता. दरम्यान, आयुक्तांच्याविषयी चर्चा सुरू होण्यापूर्वी भाजपाच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती दर्शना भोईर यांनी आयुक्तांच्या विषयावरून मुद्दामून राजकारण केले जात असल्याचे सांगत सभेत गोंधळ घालण्यास सुरु वात केली.
नियोजित बैठकीत आपले मत मांडण्यासाठी सहभागी झालेले श्याम फडणीस, कीर्ती मेहरा, मुकुंद इनामदार आणि अन्य सामाजिक संस्थांच्या ज्येष्ठांनी विरोध दर्शवित नियोजित बैठकीबद्दल बोलण्यास सांगितले असता दर्शना भोईर, नीता माळी, सुहासिनी केकाणे तसेच भरत जाधव यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे तासभर गोंधळात गाजलेल्या या बैठकीत पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. या बैठकीच्या मध्यंतरी भाजपा नगरसेवक संतोष शेट्टी, नगरसेवक जगदीश गायकवाड हे देखील सहभागी झाले. यावेळी जगदीश गायकवाड यांनी आयुक्त कशाप्रकारे कामात अडथळे घालत आहेत ही माहिती उपस्थितांना दिली. दरम्यान, बैठकीत वाढता गोंधळ पाहता बैठक तहकूब करण्याचा निर्णय आयोजकांना घ्यावा लागला.
भाजपाच्या पहिल्या तुकडीला नियोजनाची बैठक ताब्यात घेण्यात अपयश आल्याने अर्ध्या तासाच्या अंतराने नगरसेवक जगदीश गायकवाड, संतोष शेट्टी, किशोर चौतमोल यांचे आगमन झाले. गायकवाड यांनी आयुक्तांविरोधात भाषण केले. आयुक्तांच्या समर्थनार्थ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची देखील भेट त्यांच्या समर्थनार्थ उतरलेल्या संघटना व पदाधिकारी घेणार आहेत.
भाजपा समर्थकांनी घातलेल्या गोंधळाविषयी ज्येष्ठ नागरिकांसह सामाजिक संस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला
मनपा आयुक्तांविरोधात भाजपा अविश्वास ठराव मांडणार आहे. भाजपाच्या या भूमिकेविषयी शहरवासीयांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. आयुक्तांना पाठिंबा देण्यासाठी शेतकरी कामगार पक्षासह सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. २१ मार्चला आयुक्तांवरील विश्वासदर्शक ठराव या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यासाठी शहरात जनजागृती सुरू केली असून पहिल्याच मीटिंगमध्ये भाजपा पदाधिकाºयांनी गोंधळ घातला. यामुळे शहरवासीयांनी नाराजी व्यक्त केली असून सत्ताधारी भाजपा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच घाला घालत असल्याची टीका होऊ लागली आहे.