युतीसाठी भाजपाचे 'मिशन 50-50'
By admin | Published: January 18, 2017 03:32 PM2017-01-18T15:32:52+5:302017-01-18T15:36:49+5:30
आज झालेल्या दुसऱ्या बैठकीत युतीबाबत चर्चा झाली पण अंतिम निर्णय अद्याप झाला नाही
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजपाच्या जागावाटपावरुन युतीच्या निर्णयाचे गु-हाळ सुरू आहे. पारदर्शक कारभारावर पहिल्या बैठक पार पडली होती. आज झालेल्या दुसऱ्या बैठकीत युतीबाबत चर्चा झाली पण अंतिम निर्णय अद्याप झाला नाही. मिळालेल्या माहितीनुसार आज झालेल्या बैठकीत भाजपकडून युतीसाठी 50-50 चा फॉर्म्युला ठेवण्यात आला आहे. भाजपाने मुंबई महापालिकेत 114 जागांची मागणी केली आहे. काल शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री यांची फोनवरुन चर्चा झाली आहे.
आज झालेल्या बैठकीत सकारत्मक चर्चा झाली आहे. रात्री दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची यादी एकमेंकाकडे दिली जाईल, त्यानंतर अंतिम निर्णय होईल असे बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना शिवसेनेचे खासदार अनिल देसाई म्हणाले.
गेल्या बैठकीच्यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे बैठकीला उपस्थित होते. यावेळी मात्र ते हजर नव्हते. आज शिवसेनेकडून अनिल परब, अनिल देसाई, रविंद्र मिर्लेकर यांनी उपस्थिती लावली. तर भाजपकडून आशिष शेलार, प्रकाश मेहता आणि विनोद तावडेंनी हजेरी लावली.
मुंबई महापालिकेत एकूण 227 जागा आहेत. भाजपाने 114 जागा लढवल्यास शिवसेनेसाठी 113 जागा राहणार आहेत, भाजपाच्या या प्रस्तावावर शिवसेना तयार होणार का? हा प्रश्न सध्या शिवसैनाकांना भेडसावत असेल. युतीच्या बैठकीपुर्वी शिवसेने भाजपाला 75 जागावर निवडणूक लढवण्याची ऑफर केली होती. स्वराज्य संस्थामध्ये भाजपा राज्यात प्रथम क्रमांकावर होता. आपली राज्यातील वाढती ताकद आणि मतदारांचा कौल पाहून भाजपाने शिवसेनेकडे 50-50 चा पॉर्म्युल्याचा प्रस्ताव ठेवला आहे.