स्फोटामुळे उलवेतील घरांना तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 06:00 AM2017-11-13T06:00:56+5:302017-11-13T06:01:21+5:30

शनिवारी उलवे गावात टेकडीचे सपाटीकरण करण्यासाठी केल्या जाणार्‍या सुरुंग स्फोटांमुळे तीन घरांना तडे गेले. यासंदर्भात दहा गाव संघर्ष समितीने रविवारी बैठक घेऊन गावांचे स्थलांतरण केल्यानंतर हे स्फोट घडविण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात सिडकोला निवेदन देणार असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. 

Blasting houses forced to crack | स्फोटामुळे उलवेतील घरांना तडे

स्फोटामुळे उलवेतील घरांना तडे

Next
ठळक मुद्देविमानतळ प्रकल्पाचे काम आधी पुनर्वसन करा मगच स्फोट करादहा गाव संघर्ष समितीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम वेगाने सुरू झाले असून, ग्रामस्थांच्या विरोधाला न जुमानता सिडकोने पोलीस बंदोबस्तात काम सुरू केले आहे. मात्र, शनिवारी उलवे गावात टेकडीचे सपाटीकरण करण्यासाठी केल्या जाणार्‍या सुरुंग स्फोटांमुळे तीन घरांना तडे गेले. यासंदर्भात दहा गाव संघर्ष समितीने रविवारी बैठक घेऊन गावांचे स्थलांतरण केल्यानंतर हे स्फोट घडविण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात सिडकोला निवेदन देणार असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. 
विमानतळाच्या कामाला आमचा विरोध नाही. टेकडीच्या सपाटीकरणासाठी केल्या जाणार्‍या स्फोटांमुळे घरांना तडे जात असल्याचा दावा ग्रामस्थांनी यापूर्वीही केला होता. मात्र, शनिवारी उलवे येथील समीर म्हात्रे, प्रेमनाथ मढवी, आदेश म्हात्रे यांच्या घरांना तडे गेल्याने उलवे, कोंबडभुजे, तरघर, गणेशपुरी या ग्रामस्थांची बैठक उलवे येथील हनुमान मंदिरात पार पडली. या वेळी सिडकोने सर्वप्रथम गावांचे पुनर्वसन करावे, ही मागणी करण्यात आली. 
भरावाच्या कामाने कोणाताही धोका नसल्याने ते चालू ठेवावे, मात्र, स्फोटामुळे घरांना तडे जाऊन दुर्घटना होण्याची शक्यता दहा गाव संघर्ष समितीचे अध्यक्ष नाथा म्हात्रे यांनी व्यक्त केली. याकरिता सिडको व्यवस्थापकीय संचालय, संबंधित पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पालकमंत्र्यांना पत्र देणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रकल्पग्रस्तांसोबत झालेल्या बैठकीत सिडको व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी स्फोटामुळे ग्रामस्थांच्या घरांना कोणताच धोका नसल्याचा दावा केला होता. मात्र, आता घरांना तडे जाऊ लागल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यासंदर्भात सिडकोचे जनसंपर्क अधिकारी मोहन निनावे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. 

Web Title: Blasting houses forced to crack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.