रेल्वे रुळालगत आढळला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 02:29 AM2017-10-06T02:29:48+5:302017-10-06T02:30:06+5:30

दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तळवली येथील तरुणाचा रेल्वे रुळालगत मृतदेह आढळून आला आहे. सदर तरुण ठाणे येथील रात्रशाळेतील बारावीचा विद्यार्थी होता.

The bodies found on the railway track | रेल्वे रुळालगत आढळला मृतदेह

रेल्वे रुळालगत आढळला मृतदेह

Next

नवी मुंबई : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तळवली येथील तरुणाचा रेल्वे रुळालगत मृतदेह आढळून आला आहे. सदर तरुण ठाणे येथील रात्रशाळेतील बारावीचा विद्यार्थी होता. रेल्वेतून पडून त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असला, तरी त्याच्या मृत्यूमागे घातपाताची शक्यता त्याच्या कुटुंबीयांनी वर्तवली आहे.
सुजित सोनवणे (१७), असे मयत तरुणाचे नाव असून, तो तळवली नाका येथील राहणारा आहे. ठाणे येथील रात्रशाळेत तो बारावीचे शिक्षण घेत होता. दोन दिवसांपूर्वी रात्रशाळेत जाण्यासाठी तो घरातून बाहेर गेला होता. मात्र, यानंतर तो परत न आल्यामुळे तो बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांंनी रबाळे पोलिसांकडे केली होती. यादरम्यान पोलिसांनी योग्य प्रतिसाद दिला नसल्याचा त्याच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. त्याचा शोध सुरू असतानाच, गुरुवारी सकाळी एका तरुणाचा मृतदेह रबाळे नाका येथे रेल्वे रुळालगत आढळून आला. रबाळे पोलिसांसह रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, मृतदेह ताब्यात घेतला. या वेळी तपासादरम्यान तो मृतदेह सुजित याचा असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, मुलाच्या मृत्यूची माहिती मिळताच त्याचे वडील श्यामराव सोनवणे यांनी रबाळे पोलीस ठाण्याबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी त्यांना आवर घातला; परंतु पालकांची तक्रार प्राप्त होताच, सुजित बेपत्ता असल्याची नोंद पोलीस ठाण्यात केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी सांगितले. तर गुरुवारी सकाळी सुजित याचा मृतदेह रेल्वे रुळालगत आढळल्याने सदर घटनेची नोंद वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात केली आहे. त्याचा मृत्यू रेल्वेतून पडून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून आहे.

Web Title: The bodies found on the railway track

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा