शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
5
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
6
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
7
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
9
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
10
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
11
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
12
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
13
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
14
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
16
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
17
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
18
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
19
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
20
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज

बोगस माथाडी टोळ्यांना बसणार चाप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 1:02 AM

माथाडी कामगारांच्या नावे कंपनी, मॉल व्यवस्थापकांकडून खंडणी उकळणाऱ्या बोगस टोळ्यांवर कारवाईचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

- सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : माथाडी कामगारांच्या नावे कंपनी, मॉल व्यवस्थापकांकडून खंडणी उकळणाऱ्या बोगस टोळ्यांवर कारवाईचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. अशा टोळ्यांमुळे मूळ कामगारांच्या कामावर परिणाम होत चालला आहे. त्यामुळे या संदर्भात माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी केलेल्या तक्रारीनुसार मुख्यमंत्र्यांनी बोगस टोळ्यांविरोधात सक्त कारवाईचे संकेत दिले आहेत.माथाडी कामगारांच्या नावे खंडण्या उकळणाºया टोळ्या शहरात सक्रिय झाल्या आहेत. त्यांच्याद्वारे बोगस संघटना स्थापन करून कंपन्या व मॉल व्यवस्थापनांना खंडण्यासाठी धमकावले जात आहेत. मूळ माथाडी कामगारांचे काम हिसकावून घेत काम न करता, कंपन्यांकडून ठरावीक कामगारांचे वेतन काढले जात आहे. यामुळे अशा बोगस टोळ्यांच्या माध्यमातून तयार झालेल्या कथित माथाडी नेत्यांकडे करोडोची संपत्ती जमा होत चालली आहे. याचा फटका मूळ माथाडी कामगारांच्या कामावर होत असल्याने, अशा प्रकारच्या नवीन चळवळींना आळा बसला पाहिजे, अशी मागणी माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी मंगळवारी घणसोलीत झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांकडे केली. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माथाडी कामगारांच्या नावे खंडण्या उकळणाºयांवर सक्त कारवाईचे संकेत दिले. ज्यांनी माथाडी कामगारांच्या नावे अशी दुकाने मांडली आहेत, त्यांना सोडणार नसल्याचाही इशारा दिला. त्यामुळे शहरातील बोगस माथाडी संघटनांना आळा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मागील काही वर्षांत शहरातील माथाडी कामगारांच्या संघटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यापैकी बहुतांश संघटनांचा उद्देश केवळ मॉल व कंपनी चालकांना धमकावण्याचा असल्याचे आजवरच्या घटनांवरून दिसून येत आहे. तर अशा टोळ्यांमध्ये बिगर माथाडी व्यक्तींचाही सहभाग दिसून आलेला आहे. दोन वर्षांपूर्वी एमआयडीसीतल्या व्यावसायिकांनी तत्कालीन पोलीस आयुक्तांकडेही बोगस माथाडी संघटनांकडून होत असलेल्या त्रासाची तक्रार केली होती. आर्थिक फायद्यासाठी मूळ माथाडी व बोगस माथाडी कामगारांच्या संघटनांमध्ये वादाचेही प्रकार घडत आहेत. अशाच वादातून सीवूड, वाशी येथील मॉलमध्ये दोन टोळ्यांमध्ये हाणामारीच्या घटनाही घडल्या आहेत. तर काही वर्षांपूर्वी माथाडी टोळींच्या वादातून सीवूड येथे एकाची हत्याही झालेली आहे.