नियोजनपूर्वक पिकवा भात

By admin | Published: May 12, 2016 02:00 AM2016-05-12T02:00:59+5:302016-05-12T02:00:59+5:30

देशातील बहुतांश नागरिकांचे जेवण भाताशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, तर महाराष्ट्रातील कोकणासह आंध्र, तेलंगणा, तमिळनाडू, केरळ, आसाम, आदी राज्यांतील नागरिकांचे मुख्य अन्नच भात आहे

Boil the rice for planning | नियोजनपूर्वक पिकवा भात

नियोजनपूर्वक पिकवा भात

Next

पालघर: देशातील बहुतांश नागरिकांचे जेवण भाताशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, तर महाराष्ट्रातील कोकणासह आंध्र, तेलंगणा, तमिळनाडू, केरळ, आसाम, आदी राज्यांतील नागरिकांचे मुख्य अन्नच भात आहे. त्यामुळे देशात भाताचे पीक मोठयÞा प्रमाणात घेतले जाते. याला आपला पालघर जिल्हाही अपवाद नाही. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात मोठयÞा प्रमाणात पाऊस पडणार्?या भागात भाताचे पीक मोठयÞा प्रमाणात घेतले जाते. भाताच्या उत्पादनाच्या प्रदेशानुसार व तेथील पावसाच्या प्रमाणानुसार विविध पद्धती आहेत. सध्या जिल्ह्यात भातशेतीच्या मशागतीची तयारी सुरू आहे. योग्य नियोजन, पाण्याची उपलब्धता आण ितण, कीड नियंत्रण केल्यास भाताचे विक्रमी उत्पादन काढणे शक्य आहे. भात लावणीचे प्रचलित तीन प्रकार आहेत.
लावणी पद्धत : ज्या विभागात १,५०० मि.मी. पेक्षा जास्त पाऊस पडतो अशा कोकण आणि विदर्भातील नागपूर विभागात प्रामुख्याने लावणी पद्धतीने भात पीक घेतले जाते. तेथे भात रोपे रोपवाटिकेत तयार करून लहान लहान वाफे करून बैलांच्या अथवा छोट्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने चिखलणी केली जाते. रोपे पुरेशी उंच आल्यावर लावणी केली जाते. या पद्धतीमध्ये वाफ्यात पाणी तुंबून रहात असल्याने अधिक पाणी लागणारे इंद्रायणी, बासमती यासारख्या (पाणबुडी) भाताच्या जाती लावल्या जातात. कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी, चंदगड, आजरा, पन्हाळा तालुक्यांतील काही भागात लावणी पद्धत वापरली जाते.
पेरणी पद्धती : विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील १५०० मि. मी. पेक्षा कमी पाऊसमान असणार्?या प्रदेशात पेरभात व टोकन पद्धतीचा अवलंब केला जातो. या पद्धतीमध्ये जमीन नांगरल्यानंतर कुळवाच्या चार ते पाच पाळ्या देऊन जमिनीची चांगली मशागत करावी लागते. पाऊस पडण्यापूर्वी धूळवाफ पद्धतीने किंवा पाऊस पडल्यानंतर वापशावर कुरीने दोन ओळींतील अंतर २० ते २२.५ सें.मी. ठेवून पेरणी केली जाते.
टोकण पद्धत : कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागात ही पद्धत यशस्वी झाली आहे. जमिनीचा पोत पाहून त्याप्रमाणे गरव्या व निमगरव्या जाती २० बाय १५ सें.मी. आणि हळव्या जाती १५ बाय १५ सें.मी. अंतरावर व एका ठिकाणी २ ते ३ दाण्यांची टोकण करतात. या पद्धतीमध्ये जमिनीची उत्तम मशागत करावी लागते. त्यानंतर दोरीने अथवा तिकाटन्याने उभ्या आडव्या रेषा मारून फुलीवर दाणे पेरावेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्व भागात पेरणी व टोकण पद्धत वापरली जाते.
आंतरमशागत : भात लावणीनंतर १५ दिवसांनी निंदणी करून तण काढून टाकावे. पिकाची स्थिती आण ितणांची तीव्रता यानुसार दर १५ दिवसांनी निंदणी अथवा कोळपणी पीक पोटरीत येईपर्यंत करावी. लावणीनंतर भात खाचरांमध्ये सतत ५ ते ६ सें.मी. पाण्याची उंची ठेवल्यास तणांचा बंदोबस्त होण्यास मदत होते.
तणनाशक : तणनाशके वापरूनसुद्धा तणाचा बंदोबस्त करता येते. त्यासाठी ब्युटाक्लोर ५० ई.सी. किंवा बेन्थिओकार्ब ५० ई. सी. यापैकी कोणतेही एक तणनाशक वापरावे. लावणीनंतर सहा दिवसांच्या आत वरीलपैकी कोणतेही तणनाशक हेक्टरी तीन लिटर, ५०० मि.ली. पाण्यातून फवारावे. फवारणी करण्याच्या अगोदर शेतीतील सर्व पाणी काढून टाकावे व नंतर २४ तासांनी खाचरात पुन्हा पाणी भरावे.
खते : पेरणीच्या वेळी २० टक्के नत्र, स्फुरद व पालाश द्यावे. पेरणीनंतर ३० दिवसांनी ५० टक्के नत्न, द्यावे. पुन्हा ३० दिवसांनी राहिलेले ३० टक्के नत्र द्यावे. बागायती पेरभातास ८०:५०:५० किलो नत्र, स्फुरद व पालाश प्रती हेक्टरी द्यावे, तर कोरडवाहू पेरभातास ६०:३०:३० किलो नत्र, स्फुरद व पालाश हेक्टरी द्यावे. नत्नाची ५० टक्के मात्र, पूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी व राहिलेले ?0 टक्के नत्र फुटवे येण्याच्या वेळी द्यावे.
पाणी व्यवस्थापन : शेतात २ ते ५ से.मी. उंची इतके पाणी ठेवावे. ही पातळी लावणी केलेली रोपे चांगली मुळे चिक धरेपर्यंत ठेवावी. त्यानंतर पिकातील दाण्यात चिक भरेपर्यंत पाण्याची पातळी ५ सें. मी. ठेवावी. वारंवार पाणीपुरवठा व निचरा यांची सोय करावी. लोंब्या येण्यापूर्वी १० दिवस आणि लोंब्या आल्यानंतर १० दिवसांपर्यंत शेतातील पाण्याची पातळी १० सें.मी. ठेवावी. त्यानंतर पाण्याची पातळी कमी करावी. भात दाणे व्यविस्थत आणि एकाच वेळी भरावा, पिकाची कापणी व्यवस्थित व्हावी, यासाठी कापणीपूर्वी १० दिवस अगोदर पिकातील पाणी काढावे.
दापोग : फिलीपाइन्स व जपानमध्ये रोपे तयार करण्याची लोकप्रिय असलेली दापोग ही नवीन पद्धत आहे. या पद्धतीने रोपे तयार करून वर्षातून तीनवेळा पिके घेता येतात. दापोग वाफा अंगणात, ओसरीवर, परसात, गच्चीवर, लाकडी पलंगावर, टेबलावर, फळ्यांवर सोयीनुसार करता येतो.
या वाफ्यात पाणी साठून राहण्यासाठी विटा किंवा लाकडी पट्टीच्या साहाय्याने वाफ्याच्या चारी बाजू ८ ते १० सें.मी. उंच करतात. वाफा तयार करण्यास प्लास्टिकचा कागद वापरतात. या वाफ्याची रु ंदी १.५ मीटर असते. लांबी सोयीनुसार ठेवावी. एक चौरस मीटर क्षेत्रासाठी ३.५ किलो बियाणे वापरतात.
(प्रतिनिधी)

Web Title: Boil the rice for planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.