शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
3
Video : जंगलात फिरताना चुकून अस्वलाच्या घरात गेला अन्...; पहा इन्फ्लूअन्सर काय घडलं?
4
ऑनलाईन गेमच्या नादात JEE क्वालिफाय तरुणावर ९६ लाखांचं कर्ज; आयुष्य झालं उद्ध्वस्त, म्हणाला...
5
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
6
संग्रामसाठी पत्नी मैदानात; अंकिता, पॅडी कांबळेसह ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर, पाहा Video
7
अंबानींच्या ₹1च्या शेअरनं दिला खटा-खट परतावा, कर्ज कमी होताच पाडतोय पैशांचा पाऊस, करतोय मालामाल!
8
पगारातून पूर्ण होत नव्हते शौक, यूट्युबवरून शोधलं बनावट नोटा छापण्याचं तंत्र आणि..., ६ जण अटकेत 
9
होणारी सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
10
शनिवारी संकष्ट चतुर्थी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय अवश्य करा; बाप्पा-शनी शुभ करतील! 
11
एलन मस्कही चक्रावले! टेस्लाच्या सायबर ट्रकची रशिया-युक्रेन युद्धात एन्ट्री; सात किमीपर्यंत गनचा मारा
12
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
13
'आप'कडून अरविंद केजरीवालांसाठी सरकारी निवासस्थानाची मागणी, निवडणूक आयोगाच्या नियमांचा दिला हवाला 
14
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
15
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
16
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
17
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
18
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
19
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
20
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा

नियोजनपूर्वक पिकवा भात

By admin | Published: May 12, 2016 2:00 AM

देशातील बहुतांश नागरिकांचे जेवण भाताशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, तर महाराष्ट्रातील कोकणासह आंध्र, तेलंगणा, तमिळनाडू, केरळ, आसाम, आदी राज्यांतील नागरिकांचे मुख्य अन्नच भात आहे

पालघर: देशातील बहुतांश नागरिकांचे जेवण भाताशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, तर महाराष्ट्रातील कोकणासह आंध्र, तेलंगणा, तमिळनाडू, केरळ, आसाम, आदी राज्यांतील नागरिकांचे मुख्य अन्नच भात आहे. त्यामुळे देशात भाताचे पीक मोठयÞा प्रमाणात घेतले जाते. याला आपला पालघर जिल्हाही अपवाद नाही. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात मोठयÞा प्रमाणात पाऊस पडणार्?या भागात भाताचे पीक मोठयÞा प्रमाणात घेतले जाते. भाताच्या उत्पादनाच्या प्रदेशानुसार व तेथील पावसाच्या प्रमाणानुसार विविध पद्धती आहेत. सध्या जिल्ह्यात भातशेतीच्या मशागतीची तयारी सुरू आहे. योग्य नियोजन, पाण्याची उपलब्धता आण ितण, कीड नियंत्रण केल्यास भाताचे विक्रमी उत्पादन काढणे शक्य आहे. भात लावणीचे प्रचलित तीन प्रकार आहेत.लावणी पद्धत : ज्या विभागात १,५०० मि.मी. पेक्षा जास्त पाऊस पडतो अशा कोकण आणि विदर्भातील नागपूर विभागात प्रामुख्याने लावणी पद्धतीने भात पीक घेतले जाते. तेथे भात रोपे रोपवाटिकेत तयार करून लहान लहान वाफे करून बैलांच्या अथवा छोट्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने चिखलणी केली जाते. रोपे पुरेशी उंच आल्यावर लावणी केली जाते. या पद्धतीमध्ये वाफ्यात पाणी तुंबून रहात असल्याने अधिक पाणी लागणारे इंद्रायणी, बासमती यासारख्या (पाणबुडी) भाताच्या जाती लावल्या जातात. कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी, चंदगड, आजरा, पन्हाळा तालुक्यांतील काही भागात लावणी पद्धत वापरली जाते.पेरणी पद्धती : विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील १५०० मि. मी. पेक्षा कमी पाऊसमान असणार्?या प्रदेशात पेरभात व टोकन पद्धतीचा अवलंब केला जातो. या पद्धतीमध्ये जमीन नांगरल्यानंतर कुळवाच्या चार ते पाच पाळ्या देऊन जमिनीची चांगली मशागत करावी लागते. पाऊस पडण्यापूर्वी धूळवाफ पद्धतीने किंवा पाऊस पडल्यानंतर वापशावर कुरीने दोन ओळींतील अंतर २० ते २२.५ सें.मी. ठेवून पेरणी केली जाते. टोकण पद्धत : कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागात ही पद्धत यशस्वी झाली आहे. जमिनीचा पोत पाहून त्याप्रमाणे गरव्या व निमगरव्या जाती २० बाय १५ सें.मी. आणि हळव्या जाती १५ बाय १५ सें.मी. अंतरावर व एका ठिकाणी २ ते ३ दाण्यांची टोकण करतात. या पद्धतीमध्ये जमिनीची उत्तम मशागत करावी लागते. त्यानंतर दोरीने अथवा तिकाटन्याने उभ्या आडव्या रेषा मारून फुलीवर दाणे पेरावेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्व भागात पेरणी व टोकण पद्धत वापरली जाते.आंतरमशागत : भात लावणीनंतर १५ दिवसांनी निंदणी करून तण काढून टाकावे. पिकाची स्थिती आण ितणांची तीव्रता यानुसार दर १५ दिवसांनी निंदणी अथवा कोळपणी पीक पोटरीत येईपर्यंत करावी. लावणीनंतर भात खाचरांमध्ये सतत ५ ते ६ सें.मी. पाण्याची उंची ठेवल्यास तणांचा बंदोबस्त होण्यास मदत होते.तणनाशक : तणनाशके वापरूनसुद्धा तणाचा बंदोबस्त करता येते. त्यासाठी ब्युटाक्लोर ५० ई.सी. किंवा बेन्थिओकार्ब ५० ई. सी. यापैकी कोणतेही एक तणनाशक वापरावे. लावणीनंतर सहा दिवसांच्या आत वरीलपैकी कोणतेही तणनाशक हेक्टरी तीन लिटर, ५०० मि.ली. पाण्यातून फवारावे. फवारणी करण्याच्या अगोदर शेतीतील सर्व पाणी काढून टाकावे व नंतर २४ तासांनी खाचरात पुन्हा पाणी भरावे.खते : पेरणीच्या वेळी २० टक्के नत्र, स्फुरद व पालाश द्यावे. पेरणीनंतर ३० दिवसांनी ५० टक्के नत्न, द्यावे. पुन्हा ३० दिवसांनी राहिलेले ३० टक्के नत्र द्यावे. बागायती पेरभातास ८०:५०:५० किलो नत्र, स्फुरद व पालाश प्रती हेक्टरी द्यावे, तर कोरडवाहू पेरभातास ६०:३०:३० किलो नत्र, स्फुरद व पालाश हेक्टरी द्यावे. नत्नाची ५० टक्के मात्र, पूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी व राहिलेले ?0 टक्के नत्र फुटवे येण्याच्या वेळी द्यावे.पाणी व्यवस्थापन : शेतात २ ते ५ से.मी. उंची इतके पाणी ठेवावे. ही पातळी लावणी केलेली रोपे चांगली मुळे चिक धरेपर्यंत ठेवावी. त्यानंतर पिकातील दाण्यात चिक भरेपर्यंत पाण्याची पातळी ५ सें. मी. ठेवावी. वारंवार पाणीपुरवठा व निचरा यांची सोय करावी. लोंब्या येण्यापूर्वी १० दिवस आणि लोंब्या आल्यानंतर १० दिवसांपर्यंत शेतातील पाण्याची पातळी १० सें.मी. ठेवावी. त्यानंतर पाण्याची पातळी कमी करावी. भात दाणे व्यविस्थत आणि एकाच वेळी भरावा, पिकाची कापणी व्यवस्थित व्हावी, यासाठी कापणीपूर्वी १० दिवस अगोदर पिकातील पाणी काढावे.दापोग : फिलीपाइन्स व जपानमध्ये रोपे तयार करण्याची लोकप्रिय असलेली दापोग ही नवीन पद्धत आहे. या पद्धतीने रोपे तयार करून वर्षातून तीनवेळा पिके घेता येतात. दापोग वाफा अंगणात, ओसरीवर, परसात, गच्चीवर, लाकडी पलंगावर, टेबलावर, फळ्यांवर सोयीनुसार करता येतो. या वाफ्यात पाणी साठून राहण्यासाठी विटा किंवा लाकडी पट्टीच्या साहाय्याने वाफ्याच्या चारी बाजू ८ ते १० सें.मी. उंच करतात. वाफा तयार करण्यास प्लास्टिकचा कागद वापरतात. या वाफ्याची रु ंदी १.५ मीटर असते. लांबी सोयीनुसार ठेवावी. एक चौरस मीटर क्षेत्रासाठी ३.५ किलो बियाणे वापरतात.(प्रतिनिधी)