राज्यात पूर्वी उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब सापडायचे, आता उद्योगांसाठी सुरक्षित वातावरण - मुख्यमंत्री 

By नामदेव मोरे | Published: March 15, 2024 08:05 PM2024-03-15T20:05:15+5:302024-03-15T20:08:15+5:30

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये दूरदृश्य प्रणालीद्वारे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले

bombs were found under the houses of entrepreneurs in the state, now it is a safe environment for industries says Chief Minister eknath shinde | राज्यात पूर्वी उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब सापडायचे, आता उद्योगांसाठी सुरक्षित वातावरण - मुख्यमंत्री 

राज्यात पूर्वी उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब सापडायचे, आता उद्योगांसाठी सुरक्षित वातावरण - मुख्यमंत्री 

नवी मुंबई: राज्यात पूर्वी उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब सापडत होते. आता उद्योगांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण झाले, असा टोला अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना मारून आता राज्यात नवीन उद्योग येत असून, कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक होत असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. सिडको क्षेत्रामधील ५ हजार कोटी व नवी मुंबई महानगरपालिकेच्या १,१२९ कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये दूरदृश्य प्रणालीद्वारे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. 

यावेळी त्यांनी राज्याची औद्योगिकदृष्ट्या भरभराट सुरू आहे. नवीन उद्योग येत आहेत. गुंतवणूक वाढत आहे. राज्यातील उद्योग पळविले जात असल्याचे बोलणाऱ्यांच्या काळातच उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब सापडत होते. आता संपूर्ण राज्यात सुरक्षित वातावरण आहे. नवीन उद्योगांना सर्व परवाने लवकर मिळवून देण्यासाठी सिंगल विंडो सिस्टम कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्याच्या प्रगतीच्या इंजिनाची नवी मुंबई अश्वशक्ती
नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छता व पायाभूत सुविधांच्या बाबतीत उत्तम काम केले आहे. नावीन्यपूर्ण प्रकल्प राबविले जात आहेत. राज्याच्या प्रगतीच्या इंजिनाची नवी मुंबई अश्वशक्ती असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

एमएमआर विभागात नवीन प्रकल्प
सिडकोच्या माध्यमातून विमानतळाचे काम गतीने सुरू आहे. वेळेत विमानतळाचे काम पूर्ण करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत विकासासाठी खूप संधी असून, शासनाच्या माध्यमातून या परिसरात व एमएमआर विभागात नवीन प्रकल्प सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी ठाण्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई, आमदार गणेश नाईक, मंदा म्हात्रे, महेश बालदी, रमेश पाटील, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल उपस्थित होते.
 
भूमिपूजन झालेले सिडकोचे प्रकल्प
खारघर - तुर्भे जोडणारा मार्ग  
मुंबई- पुणे द्रुतगती महामार्ग व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडणारा पूल.
भूमिपुत्र भवनचे लोकार्पण. 
उलवे किनारी मार्ग भूमिपूजन.
प्रवासी जलवाहतूक टर्मिनलचे उद्घाटन.
 
नवी मुंबई महानगरपालिकेने भूमिपूजन केलेली कामे
ऐरोली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा शिलान्यास.
पाम बीच रोडवरील घणसोली ऐरोली मार्गाचे भूमिपूजन.
अमृत योजनेंतर्गत दहा प्रकल्पांचे भूमिपूजन.

Web Title: bombs were found under the houses of entrepreneurs in the state, now it is a safe environment for industries says Chief Minister eknath shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.