बोनकोडेत घरफोडीच्या गुन्ह्याचा बनाव उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 11:27 PM2020-06-21T23:27:21+5:302020-06-21T23:27:28+5:30
पतीच्या पश्चात पत्नीने घरातील दागिने गहाण ठेवून त्याच्या रकमेतून स्वत:वरील कर्ज फेडले होते.
नवी मुंबई : बंद घरात घरफोडी होऊन चार लाखाचे दागिने चोरीला गेल्याच्या खोट्या तक्रारीचा पोलिसांनी उलगडा केला आहे. पतीच्या पश्चात पत्नीने घरातील दागिने गहाण ठेवून त्याच्या रकमेतून स्वत:वरील कर्ज फेडले होते. बंद घराच्या खिडकीतून आत घुसून चोरट्यांनी घरफोडी केल्याची तक्रार बोनकोडे येथे राहणाऱ्या व्यक्तीने कोपर खैरणे पोलिसांकडे केली होती. वरिष्ठ निरीक्षक सूर्यकांत जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक वसीम शेख यांच्या पथकाने तपासाला सुरवात केली होती. पोलिसांनी पत्नीकडे चौकशी केली असता, सदर गुन्हा घडलेलाच नसल्याचे समोर आले.
फिर्या$दी बांधकाम व्यावसायिक असून त्यांच्या पत्नीने परस्पर दागिने गहाण ठेवले. बदल्यात रक्कम मिळवून व इतर रकमेतून त्यांनी स्वत:वरील कर्ज फेडल्याची कबुली दिली. तर पतीपासून लपवण्यासाठी घरात चोरी झाल्याचा बनाव केला. पोलिसांन गुन्हा घडल्याचा पुरावा आढळला नाही.
त्यावरून कुटुंबातील व्यक्तीवरच संशय आल्याने उलट चौकशीत हा प्रकार उघड झाला.