नागरी आरोग्य केंद्र ठरतेय वरदान, कोरोना नियंत्रणात महत्त्वाची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 11:28 PM2020-09-14T23:28:23+5:302020-09-14T23:29:08+5:30

नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ब्रेक द चेन मोहीम सुरू केली आहे. मृत्युदर शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.

A boon to the civic health center, an important role in corona control | नागरी आरोग्य केंद्र ठरतेय वरदान, कोरोना नियंत्रणात महत्त्वाची भूमिका

नागरी आरोग्य केंद्र ठरतेय वरदान, कोरोना नियंत्रणात महत्त्वाची भूमिका

googlenewsNext

- नामदेव मोरे

नवी मुंबई : कोरोना नियंत्रण अभियानामध्ये नागरी आरोग्य केंद्रांची भूमिका महत्त्वाची ठरू लागली आहे. आरोग्य यंत्रणेचा कणा म्हणून २३ आरोग्य केंद्रांची ओळख निर्माण झाली आहे. रुग्ण तपासणीसह रुग्णालयात भरती करण्यापर्यंत व माहिती संकलनासह जनजागृतीपर्यंतची बहुतांश सर्व कामे या केंद्रांच्या माध्यमातूनच सुरू आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ब्रेक द चेन मोहीम सुरू केली आहे. मृत्युदर शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यामध्ये नागरी आरोग्य केंद्र महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, हे स्पष्ट झाल्यामुळेच आयुक्तांनी या केंद्रांशी समन्वय वाढविला आहे. प्रतिदिन न चुकता २३ नागरी आरोग्य केंद्रांमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला जात आहे. परिसरातील रुग्णांची संख्या, कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या, नवीन रुग्ण, मृत्युदर, महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजना या सर्व
गोष्टींचा आढावा घेत आहेत. सद्यस्थितीमध्ये शहरातील मृत्युदर कमी झाला असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. या यशामध्येही आरोग्य केंद्रांचा सिंहाचा वाटा आहे.
आरोग्य केंद्रामध्ये नियमित फ्लू ओपीडी सुरू आहे. कोरोनाव्यतिरिक्त आजारांवरही उपचार सुरू आहेत. प्रतिदिन सकाळी आरोग्य केंद्रामध्ये शहरातील कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची यादी येत असते. ती यादी तपासून कार्यक्षेत्रामधील रुग्णांची यादी तयार करणे, रुग्णांशी संपर्क साधून त्यांना रुग्णालयात भरती करणे, रुग्णाच्या संपर्कामधील व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्याचे कामही आरोग्य केंद्राच्या माध्यमातून सुरू असते.
महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविणे. परिसरातील खासगी रुग्णालयांशीही समन्वय साधण्याचे कामही आरोग्य केंद्राच्या माध्यमातून सुरू आहे.
या सर्व प्रक्रियेमध्ये आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाºयास प्रतिदिन किमान १०० ते २०० नागरिकांशी संपर्क साधावा लागत आहे.
रुग्ण व त्याचे नातेवाईक, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते या सर्वांशी सुसंवाद ठेवून काम करावे लागत आहे. नागरिकांकडून हि क ौतुक होत आहे.

कर्मचाऱ्यांचे दिवस रात्र काम
आरोग्य केंद्रातील डॉक्टर ते आरोग्यसेविका, लिंक वर्करपर्यंतचे सर्वच कर्मचारी दिवसरात्र परिश्रत करत असल्यामुळे, शहरातील कोरोनामुक्त होणाºया रुग्णांचे प्रमाण वाढू लागले आहे. खºया अर्थाने कोरोना योद्ध्याप्रमाणे येथील कर्मचारी काम करत असून, नागरिकांकडूनही त्यांचे कौतुक होऊ लागले आहे.
नागरी आरोग्य केंद्रामुळे नागरिकांना कोरोनाच्या काळात मोठा दिलासा मिळत आहे. कारण रुग्ण पॉझिटिव्ह झाल्यानंतर काय करावे? कुठे जावे? कोणत्या रु ग्णालयात दाखल करावे असे सारे प्रश्न या आरोग्य केंद्रामुळे सुटले आहेत.
रु ग्णांच्या नातेवाईकांच्या अनेक शंकांचे निरसण या ठिकाणी होत आहे.

नागरी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी
अर्चना तायडे, प्रवीण कटके, कविता बोर्डे, रत्नेश म्हात्रे, संजय आठवले, अशोक जाधव, पुष्पा जवादे, महेश चव्हाण, कैलास गायकवाड, मनेका पाटील, विद्या वर्मा, मैथिली शिंदे, वंदना नारायणे, उज्ज्वला बारापात्रे, दर्शना वाघमारे, वर्षा तळेगावकर, सचिन चिटणीस, भावना बनसोडे, सुषमा सारूक्ते, मिलिंद वसावे, सुरेश कुंभारे, वैशाली म्हात्रे, अपर्णा मालवणकर.

आरोग्य केंद्राच्या माध्यमातून होणारी कामे
- प्रत्येक नागरी आरोग्य केंद्रात फ्लू ओपीडी सुरू.
- सकाळी सात वाजता शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांच्या यादीतून कार्यक्षेत्रातील रुग्णांच्या नावांची छाननी.
- पॉझिटिव्ह रुग्णांशी संपर्क साधून त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था करणे.
- रुग्णाच्या जवळच्या संपर्कातील किमान २० नागरिकांशी संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणे.
- जवळच्या संपर्कातील व्यक्तीची आरोग्य तपासणी करणे.
- रुग्णाचा पत्ता चुकीचा असेल किंवा चुकीचा नंबर असेल, तर त्याविषयी पुढील उपाययोजनांसाठी वरिष्ठांना माहिती देणे.
- कोरोनाविषयी परिसरातील नागरिकांमध्ये जनजागृती करणे, नागरिकांशी संवाद साधणे.
- प्रत्येक घरोघरी जाऊन होणाऱ्या सर्वेक्षणावर लक्ष ठेवणे.
- कंटेन्मेंट झोन व कोरोना प्रतिबंधासाठीच्या नियमांचे परिसरात अंमलबजावणी करणे.
- कोरोनाव्यतिरिक्त लसीकरण व इतर आरोग्यविषयी उपाययोजना करणे.

आरोग्य केंद्रनिहाय शिल्लक रुग्ण
व कोरोनामुक्त झालेल्यांचा तपशील
आरोग्य केंद्र अ‍ॅक्टिव्ह केसेस कोरोनामुक्त
ऐरोली १६७ १,५९५
सीबीडी २२१ १,५३६
चिंचपाडा २० २५९
दिघा ६३ ७३९
घणसोली २९६ २,५५०
इलठाणपाडा ९ ३७०
इंदिरानगर १० १४९
जुहूगाव ३१९ १,५६३
करावे २१६ १,१३७
कातकरीपाडा २० २२५
खैरणे २२५ २,४६६
कुकशेत १७३ १,३६७
महापे १९३ १,५१४
नेरुळ १ १३३ १,०५३
नेरुळ २ ७९ ९७५
नोसील नाका ५५ ७५५
पावणे १५५ ८५४
रबाळे २३८ १,७८३
सानपाडा २६९ १,५६०
से. ४८ सीवूड १८६ ८१५
शिरवणे १५२ १,४६९
तुर्भे १०६ ७६१
वाशीगाव २१२ ९९०

Web Title: A boon to the civic health center, an important role in corona control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.