बोर्डी - महाशिवरात्रीनिमित्त डहाणू तालुक्यातील बोर्डी आणि तलासरी तालुक्यातील झाई समुद्रकिनाऱ्यावर महादेवाचे वाळूशिल्प साकारण्यात आली होती. यंदाही भक्तांनी ही परंपरा जोपासली, त्यामध्ये महिलांनीही योगदान दिले. (Bordi and Zai beach sand sculptures on the occasion of Mahashivaratri) डहाणूतील बोर्डी आणि झाई या समुद्रकिनारी महाशिवरात्रीला महादेवांचे वाळूशिल्प साकारण्याची परंपरा आहे. यासाठी पहाटेपासूनच नागरिक समुद्रकिनारी दाखल होतात. वाळू गोळा करण्यासाठी बच्चे कंपनीने पुढाकार घेतला होता. महादेवाच्या वेगवेगळ्या आकारांच्या पिंडी आणि नंदी यावेळी बनविले होते. त्यानंतर शंख, शिंपले आणि फुलांनी त्याची सजावट केली होती. त्यानंतर महिलांनी या पिंडींचे विधिवत पूजन केले. त्यानंतर बच्चेकंपनींनी समुद्रात पोहण्याचा आनंद घेतला.
दरवर्षी बोर्डीतील वाळूशिल्पकार भास्कर दमणकर सात ते आठ फूट उंचीचे उभे वाळूशिल्प साकारतात. ते पाहण्यासाठी पर्यटकांची चौपाटीवर गर्दी जमते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी यावेळी शिल्प न साकारल्याने अनेकांचा हिरमोड झाला.