जासई -चिर्ले आणि रांजणपाडा दरम्यान असलेले दोन्ही रेल्वे क्रॉसिंग वाहतुकीसाठी कायमस्वरूपी बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 01:42 PM2023-08-17T13:42:26+5:302023-08-17T13:42:49+5:30
मध्यरेल्वे प्रशासनाचा निर्णय
मधुकर ठाकूर
उरण : उड्डाणपूल उभारण्यात आल्यानंतर जेएनपीए रेल्वे मालवाहतूक दरम्यान जासई -चिर्ले दरम्यान असलेला लेव्हल क्रॉसिंग गेट क्र- २ आणि रांजणपाडा लेव्हल क्रॉसिंग गेट-३ मध्यरेल्वे प्रशासनाने कायम स्वरुपी बंद केले आहेत.
जासई -चिर्ले आणि रांजणपाडा दरम्यान असलेल्या दोन्ही रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत.या दोन्ही उड्डाणपूलांचा लोकार्पण सोहळा बुधवारी (१६) संपन्न झाला.त्यानंतर खबरदारीची उपाययोजना म्हणून मध्यरेल्वे प्रशासनाने या दोन्ही रेल्वे क्रॉसिंगवरील दोन्ही बाजूला माती-दगडाचे भराव टाकून वाहतूक कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहेत.
सुरक्षितता सुधारण्यासाठी रोड ओव्हर ब्रिज (ROB) आणि रोड अंडर ब्रीजसह (RUB) सर्वच लेव्हल क्रॉसिंग गेट्स हळूहळू कायमचेच बंद करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे मध्यरेल्वे प्रशासनाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.