रसायनी : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर शुक्रवारी पहाटे झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. मौजे पानशीळ गावच्या हद्दीत ट्रक पुण्याकडून मुंबईकडे जात होता. ट्रकच्या उजव्या बाजूचे मागील चाक पंक्चर झाल्याने चालक व अन्य एक जण साइडपट्टीच्या बाजूला चाक बदलत असताना मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिली.अज्ञात वाहन चालकाने धडक मारून तो न थांबता निघून गेला. यामुळे याबाबत शोध सुरू असल्याचे रसायनी पोलिसांनी सांगितले. पंक्चर झालेले चालक बदलणारे अनिल कांबळे (४९ ) आणि धनाजी जैन्नपा धायगडे (३५) दोघेही रा.अकलूज (ता.माळशिरस)चे असून दोघांना गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघातात दोघांचा मृृृृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 5:11 AM