वाशीमध्ये मांसाची गाडी अडवल्याप्रकरणी दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 04:12 AM2017-07-20T04:12:53+5:302017-07-20T04:12:53+5:30

ट्रकमधून नेले जाणारे मांस गोमांस असल्याचे धमकावून पोलिसांकडे खोटी तक्रार करणाऱ्या दोघांना वाशी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचे तिघे साथीदार फरार

Both of them were arrested in Vashi for blocking the car | वाशीमध्ये मांसाची गाडी अडवल्याप्रकरणी दोघांना अटक

वाशीमध्ये मांसाची गाडी अडवल्याप्रकरणी दोघांना अटक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : ट्रकमधून नेले जाणारे मांस गोमांस असल्याचे धमकावून पोलिसांकडे खोटी तक्रार करणाऱ्या दोघांना वाशी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचे तिघे साथीदार फरार झाले असून, ते सर्व जण स्वत:ला पत्रकार सांगत होते.
स्वत:ला पत्रकार सांगणाऱ्या पाच जणांनी वाशी टोल नाक्यावर एक ट्रक अडवला होता. त्यामध्ये असलेले मांस गाईचे असल्याचा त्यांचा आरोप होता. मात्र ट्रकमधील व्यक्तीने त्यांना ते मांस म्हशीचे असून त्याची आवश्यक कागदपत्रे देखील दाखवली. यानंतरही त्यांनी वाशी पोलिसांकडे खोटी तक्र ार केली होती. अखेर पालिकेच्या पशू वैद्यकीय तज्ज्ञामार्फत मांस तपासले असता ते म्हशीचे असल्याचे सिद्ध झाले. यामुळे खोटी तक्रार करून अधिकार नसतानाही वाहन अडवल्या प्रकरणी त्या पाच तोतया पत्रकारांच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी दोघांना अटक झाली असून किशोर पाटील व गुलाब गुप्ता अशी त्यांची नावे आहेत. त्यांचे तिघे साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. त्या पाच जणांमध्ये दोन महिलांचाही समावेश असून त्या ठाणे व पुण्याच्या राहणाऱ्या आहेत.

Web Title: Both of them were arrested in Vashi for blocking the car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.