बोर्डीतील मद्य दुकानांना ना हरकत नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 06:58 AM2018-12-16T06:58:41+5:302018-12-16T06:59:13+5:30
अप्पर पोलीस अधीक्षक : घोलवडच्या सभेत महिलांना आश्वासन
अनिरुद्ध पाटील
डहाणू : घोलवड पोलिसांची वार्षिक तपासणी अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक योगेश चव्हाण यांच्या मार्फत शुक्र वारी घेण्यात य्आली. त्या नंतर या ठाण्याच्या कार्यक्षेत्राअंतर्गत जेष्ठ नागरीक, महिला, सागर रक्षक आदींची बैठक पार पडली. यावेळी बोर्डीतील ग्रामसभेत मंजुर तीन बियरशॉप आणि दोन परिमट रूम बाबत महिलांचा कडाडून विरोध लक्षात घेता, पोलीस विभाग या बाबत ना हरकत दाखल देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी आणि कर्मचाऱ्यांच्या समस्या या बाबतचा आढावा चव्हाण यांनी घेतला. त्यानंतर परिसरातील नागरिक, ग्रामराक्षक दल, महात्मा गांधी तंटामुक्त समिती आणि महिला यांच्या करीता आयोजित सभेत विविध मुद्यांवर चर्चा केली. त्यानंतर बोर्डी गावातील नव्याने मंजूर मद्य दुकानांविषयी उपस्थित महिलांनी पोलिसांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, तरु ण पिढीला योग्य मार्गदर्शनाची गरज असून त्याकरीता समाजप्रबोधन झाले पाहीजे. शैक्षणिक पंढरी म्हणून ओळखल्या जाणाºया या गावात महिलांचा मद्य दुकानांना विरोध असल्याने पोलिसांचेही सहकार्य लाभेल असा विश्वास दिला. त्यामुळे या आंदोलनात लढणाºयांचा आत्मविश्वास उंचावला असल्याची प्रतिक्रि या महिलांनी व्यक्त केली. यावेळी घोलवड ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी, ग्रामरक्षक दलाचे सदस्य, घोलवड तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रकाश अमृते व सदस्य, या ठाण्याअंतर्गत कार्यक्षेत्रातील नागरिक उपस्थित असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांनी दिली.
पालघर जिल्ह्यात नवीन परमीट रु म तसेच बियर विक्री परवान्यासाठी आलेल्या प्रस्तावाला ना हरकत दाखला न देण्याचे वरिष्ठांचे आदेश आहेत. बोर्डीकरिता सुद्धा हीच भुमिका असेल.
- योगेश चव्हाण, अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक, पालघर