शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

एपीएमसीतील लाकडी पेट्यांसह खोके पुन्हा ऐरणीवर

By नारायण जाधव | Published: March 30, 2024 6:09 PM

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळे मार्केट आवारातील सर्व्हिस रोडलगतच्या पदपथावर ठेवलेल्या लाकडी पेट्या व खोके यांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळे मार्केट आवारातील सर्व्हिस रोडलगतच्या पदपथावर ठेवलेल्या लाकडी पेट्या व खोके यांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पेट्या आणि खोक्यांमुळे परिसरात अपघाताला आमंत्रण मिळत असून, आगीच्या दुर्घटनाही होत आहेत. या पेट्या आणि खोक्यांवर नवी मुंबई महापालिकेने शुक्रवारी कारवाई केली असली असली तरी ती तोंडदेखली न करता मुळात त्यांनाच येथून कायमचे हटवावे, अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने केली आहे. या सर्व्हिस रोडसह पदपथ बाजार समितीच्या ताब्यात असल्याबाबतचे पत्र नगर रचना विभाग, नवी मुंबई महानगरपालिकेने यापूर्वीच दिले आहे. यानंतर बाजार समितीने नियमबाह्यरीत्या काही लोकांना लाकडी पेट्या आणि खोके ठेवण्यासाठी येथे जागा दिली. परंतु, बऱ्याच वेळा मार्केटमध्ये या खोक्यांमुळे आग लागलेली आहे.

मनुष्यहानी व वित्तहानीस जबाबदार कोणसध्या उन्हाची तीव्रता वाढत असून, मोठी आग लागून मनुष्यहानी व वित्तहानी झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न पक्षाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. सर्व्हिस रोडसह पदपथालगतची जागा लाकडी पेट्या व खोके व्यावसायिकांना उपलब्ध करून दिल्यामुळे सेक्टर २० परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे अनधिकृत लाकडी पेट्या व खोके व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशा मागणीचे पत्र पाटील यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्तांसह बाजार समितीच्या सचिवांना दिले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईfireआगSharad Pawarशरद पवार