वाशीत इमारतींची पडझड सुरूच

By admin | Published: August 12, 2015 01:12 AM2015-08-12T01:12:40+5:302015-08-12T01:12:40+5:30

वाशीतील खासगी इमारतीतील घराच्या छताचे प्लास्टर मंगळवारी सकाळी कोसळले. त्यामध्ये कोणीही गंभीर जखमी झालेले नाही. परंतु या प्रकारामुळे धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Break down of Vashi buildings | वाशीत इमारतींची पडझड सुरूच

वाशीत इमारतींची पडझड सुरूच

Next

नवी मुंबई : वाशीतील खासगी इमारतीतील घराच्या छताचे प्लास्टर मंगळवारी सकाळी कोसळले. त्यामध्ये कोणीही गंभीर जखमी झालेले नाही. परंतु या प्रकारामुळे धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
वाशी सेक्टर २९ मधील ‘जयशंकर इमारती’त ही घटना घडली. ही इमारत २० वर्षांहून अधिक जुनी आहे. त्यामुळे इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहणारे संजय जाधव यांच्या घराच्या छताचे प्लास्टर मंगळवारी सकाळी कोसळले. मोठा भाग कोसळल्याने त्यांच्या घरातील वस्तूंचे नुकसान झाले आहे. परंतु वेळीच कुटुंबातील व्यक्ती बाजूला गेल्याने गंभीर दुर्घटना टळली.
काही दिवसांपूर्वी कोपरखैरणेत सिडकोनिर्मित इमारतीत असाच प्रकार घडून दोघे जण गंभीर जखमी झाले होते. जाधव राहत असलेली जयशंकर ही खासगी इमारत आहे. त्यामुळे सिडकोनिर्मित जुन्या इमारतींसह खासगी इमारतींच्याही पुनर्बांधणीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
घटनेची माहिती मिळताच आमदार संदीप नाईक व माजी महापौर सागर नाईक यांनी जाधव कुटुंबीयांची भेट घेऊन इमारतीची पाहणी केली. या पाहणीदरम्यान खासगी इमारतींचीही पुनर्बांधणी गरजेची असल्याचे मत आमदार नाईक यांनी व्यक्त केले. सिडकोनिर्मित इमारतींसाठी एफएसआय मंजूर झालेला आहे, त्याच धर्तीवर खासगी इमारतींकरिता वाढीव एफएसआय मिळावा म्हणून शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Break down of Vashi buildings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.