शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
2
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
3
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
4
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
5
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?
6
कॅनडातील भीषण वास्तव; वेटरच्या नोकरीसाठी सुशिक्षित भारतीयांनी लावल्या रांगा...
7
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाह प्रमुख हाशिम सफीद्दीनचा खात्मा, आता फक्त एकच जिवंत...
8
पाकिस्तानी हिंदू विद्वानानं झाकीर नाईकला आरसा दाखवला; कट्टरपंथी मानसिकतेवर बोचरा प्रश्न विचारला अन्...
9
हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार; अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Women’s T20 World Cup : कोडं सुटलं; पण Harmanpreet Kaur समोर उभं राहिलं मोठं चॅलेंज
11
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...
12
इराणमध्ये मोसादची भीती! अयातुल्ला खामेनेईंचा आता कोणावरही विश्वास नाही, स्वतःच्या सैन्याची सुरू केली चौकशी 
13
गरब्याची रंगत वाढणार! मुंबईत नवरात्रीचे शेवटचे तीन दिवस लाऊडस्पीकरला रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी
14
सोन्याची किंमत होती 99 रुपये तोळा, 77000 रुपयांपर्यंत कशी पोहोचली?
15
लक्ष्यभेद करणारा डोळा अन् चक्रव्यूह! 'बिग बॉस मराठी'ची चमचमती ट्रॉफी, टॉप ६ सदस्य पाहतच राहिले
16
"'ते' एक वाक्य अन् तुम्ही माझ्या करिअरचं वाटोळं केलं"; पंकजा मुंडेंनी हसत हसत हातच जोडले
17
आजोबांनी नातीसाठी फुगा आणला पण तोच जीवावर बेतला; डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक कारण
18
"इस्रायलला इशारा, अरब मुस्लिमांकडे मागितली साथ...; खामेनेईंच्या भाषणातील हे 10 मुद्दे आहेत खास
19
चार महिन्यांपासून पाकिस्तानच्या खेळाडूंचा पगार रखडला; आता PCB ने केली सारवासारव
20
महायुती सरकारच्या काळात विधिमंडळ समित्याच नाहीत, 'मविआ'ने नेमल्या पण...; अहवालातून माहिती उघड

वाशीत इमारतींची पडझड सुरूच

By admin | Published: August 12, 2015 1:12 AM

वाशीतील खासगी इमारतीतील घराच्या छताचे प्लास्टर मंगळवारी सकाळी कोसळले. त्यामध्ये कोणीही गंभीर जखमी झालेले नाही. परंतु या प्रकारामुळे धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

नवी मुंबई : वाशीतील खासगी इमारतीतील घराच्या छताचे प्लास्टर मंगळवारी सकाळी कोसळले. त्यामध्ये कोणीही गंभीर जखमी झालेले नाही. परंतु या प्रकारामुळे धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.वाशी सेक्टर २९ मधील ‘जयशंकर इमारती’त ही घटना घडली. ही इमारत २० वर्षांहून अधिक जुनी आहे. त्यामुळे इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहणारे संजय जाधव यांच्या घराच्या छताचे प्लास्टर मंगळवारी सकाळी कोसळले. मोठा भाग कोसळल्याने त्यांच्या घरातील वस्तूंचे नुकसान झाले आहे. परंतु वेळीच कुटुंबातील व्यक्ती बाजूला गेल्याने गंभीर दुर्घटना टळली. काही दिवसांपूर्वी कोपरखैरणेत सिडकोनिर्मित इमारतीत असाच प्रकार घडून दोघे जण गंभीर जखमी झाले होते. जाधव राहत असलेली जयशंकर ही खासगी इमारत आहे. त्यामुळे सिडकोनिर्मित जुन्या इमारतींसह खासगी इमारतींच्याही पुनर्बांधणीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार संदीप नाईक व माजी महापौर सागर नाईक यांनी जाधव कुटुंबीयांची भेट घेऊन इमारतीची पाहणी केली. या पाहणीदरम्यान खासगी इमारतींचीही पुनर्बांधणी गरजेची असल्याचे मत आमदार नाईक यांनी व्यक्त केले. सिडकोनिर्मित इमारतींसाठी एफएसआय मंजूर झालेला आहे, त्याच धर्तीवर खासगी इमारतींकरिता वाढीव एफएसआय मिळावा म्हणून शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले. (प्रतिनिधी)