शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
4
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
5
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
6
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित ठाकरेंना विधान परिषदेवरून आमदारकीची ऑफर दिली होती- देवेंद्र फडणवीस
7
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
8
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
9
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
10
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
11
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
12
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
13
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
14
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
15
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
16
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
17
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
18
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
19
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
20
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य

महायुती आणि महाविकास आघाडीत बिघाडी? 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2024 11:34 AM

शिक्षक-पदवीधर निवडणुकीत उभे केले एकमेकांविरोधात उमेदवार

नवी मुंबई : कोकण व मुंबई पदवीधर मतदारसंघासह मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी भाजप व उद्धवसेनेने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. दोन्ही पक्षांचे पदाधिकारी समोरासमोर येताच जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तीन मतदारसंघांसाठी एकूण ५२ अर्ज दाखल झाले असून, महायुतीमहाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे चित्र दिसत आहे. 

कोकण पदवीधर मतदारसंघासाठी भाजपकडून निरंजन डावखरे, मुंबई पदवीधरसाठी किरण शेलार व मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवनाथ दराडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपने यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. अर्ज भरण्याच्या वेळी मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, ज्ञानेश्वर म्हात्रे, किसन कथोरे, संजय केळकर, संजीव नाईक, संदीप नाईक यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. उद्धव ठाकरे गटाचे किशोर जैन यांनीही अर्ज सादर केला. कोकण भवन परिसरात भाजप व उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर येताच जोरदार घोषणाबाजी केली.

पदवीधरसाठी २२, शिक्षक मतदारसंघासाठी २० अर्जउमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत कोकण पदवीधर मतदारसंघासाठी २२ अर्ज दाखल झाले. महाविकास आघाडीमधील काँग्रेस व शरद पवार गट, उद्धवसेनेने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महायुतीतील भाजप, शिंदेसेनेने उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मुंबई पदवीधर मतदारसंघामध्ये १० अर्ज दाखल झाले असून, त्यात उद्धवसेना, शिंदेसेना, भाजपच्या उमेदवारांचा समावेश आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी २० अर्ज दाखल झाले आहेत. यात उद्धवसेना, समाजवादी रिपब्लिकन पार्टी, अजित पवार गट, काँग्रेस, शिंदेसेनेच्या उमेदवारांचा समावेश आहे. 

मुंबई शिक्षक मतदारसंघात भाजप विरुद्ध भाजप राज्यातील लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून सावरत नाही तोच विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या  निवडणुकीत भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे. या निवडणुकीसाठी  भाजप कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य अनिल बोरनारे यांनी शुक्रवारी अपक्ष म्हणून अर्ज दाखल करून पक्षाचे अधिकृत उमेदवार शिवनाथ दराडे यांना आव्हान दिले आहे.  भाजपचे अधिकृत उमेदवार दराडे यांनीही कोकण भवन येथे पक्षनेत्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार संजय केळकर, आमदार प्रसाद लाड, आमदार सुनील राणे आदी नेते उपस्थित होते. तसेच, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष वेणुनाथ कडू, आमदार भगवानराव साळुंखे, राज्य कार्यालयीन मंत्री निरंजन गिरी, अध्यक्ष सुहास हिर्लेकर, उपाध्यक्ष बबन कातकडे, भारत काकडहेही यावेळी उपस्थित होते. दराडे यांनीही शिक्षक चळवळीत २५ वर्षे कार्यरत असल्याचा दावा करत, आतापर्यंत शिक्षकांच्या विविध प्रश्रांसाठी शेकडो आंदोलने केल्याचे सांगितले. 

टॅग्स :MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीVidhan Parishadविधान परिषद