शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
3
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
4
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
5
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
6
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
7
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
9
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
10
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

भू-सुरुंगाच्या स्फोटाने घराच्या भिंतीला भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 6:17 AM

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी उलवे टेकडी सपाटीकरणाचे काम सुरू आहे. या कामादरम्यान बुधवारी दुपारी भू-सुरुंगाचे दगड ओवळे गावातील घरावर कोसळले.

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी उलवे टेकडी सपाटीकरणाचे काम सुरू आहे. या कामादरम्यान बुधवारी दुपारी भू-सुरुंगाचे दगड ओवळे गावातील घरावर कोसळले. यात एका घराच्या भिंतीला भगदाड पडले असून, सुदैवाने कोणी जखमी झाले नाही. या घटनेमुळे संतापलेल्या प्रकल्पग्रस्तांनी ठेकेदाराला धारेवर धरून काम थांबविले.टेकडी सपाटीकरणासाठी या परिसरात मोठ्या प्रमाणात भू-सुरुंग लावले जात आहेत. बुधवारी दुपारी १ वाजता केलेल्या स्फोटातील दगड दीड ते दोन किलोमीटर अंतरावरील वरचे ओवळे गावातील विलास घरत यांच्या घराच्या भिंतीवर आदळून आरपार गेले. यादरम्यान विलास घरत यांच्या आई सहा महिन्यांच्या लहान मुलीला घेऊन घरात झोपल्या होत्या. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. या प्रकारामुळे संतापलेल्या महिलांनी ब्लास्टिंग करणाऱ्या कंत्राटदाराला मारण्याचा प्रयत्न केल्याने, संबंधित ठेकदाराने पनवेल शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या वेळी वरच्या ओवळे ग्रामस्थांनीही पनवेल शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. दुपारी २ वाजल्यापासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. ब्लास्टिंगच्या कामांमध्ये कंत्राटदाराकडून वारंवार हलगर्जीपणा केला जातो, त्यामुळे कंत्राटदारावर कारवाईची मागणी ग्रामस्थ करीत होते. या घटनेसंदर्भात पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. सिडकोचे जनसंपर्क अधिकारी मोहन निनावे यांच्याशीही वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.