नवी मुंबई : कोपरखैरणे विभाग कार्यालयातील अमोल दहिवले याला १० हजाररुपयांची लाच घेताना अटक केली आहे. फेरीवाल्यांकडून कारवाई न करण्यासाठी पैसे मागितले होते. कोपरखैरणेमधील १४ हातगाडी व्यावसायिकांकडे दहिवले याने कारवाई न करण्यासाठी १४ हजार रुपयांची लाच मागितली होती. या प्रकरणी फेरीवाल्यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या आधारे २६ एप्रिल रोजी बहुउद्देशीय आरोग्य सेवक व सद्यस्थितीमध्ये अतिक्रमण विभागातील अमोल दहिवले याला तीन टाकीजवळ १० हजार रुपये लाच घेताना अटक केली.
लाचखोर पालिका कर्मचाऱ्यास अटक
By admin | Published: April 28, 2017 12:42 AM