विवाहितेच्या हत्येप्रकरणी दिराला अटक

By admin | Published: August 28, 2015 11:36 PM2015-08-28T23:36:50+5:302015-08-28T23:36:50+5:30

मूल होत नसल्यावरून तुर्भे इंदिरानगर येथील विवाहितेचा सासरच्यांकडून छळ सुरू होता. याच प्रकारात सदर विवाहितेला जाळून मारण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामध्ये १०० टक्के

The bride arrested for murder | विवाहितेच्या हत्येप्रकरणी दिराला अटक

विवाहितेच्या हत्येप्रकरणी दिराला अटक

Next

नवी मुंबई : मूल होत नसल्यावरून तुर्भे इंदिरानगर येथील विवाहितेचा सासरच्यांकडून छळ सुरू होता. याच प्रकारात सदर विवाहितेला जाळून मारण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामध्ये १०० टक्के भाजलेल्या या विवाहितेचा शुक्रवारी पहाटे मृत्यू झाला आहे.
छाया कांबळे (२५) असे मयत विवाहितेचे नाव आहे. २० आॅगस्ट रोजी तिला राहत्या घरात जाळून मारण्याचा प्रयत्न झाला होता. प्रथमदर्शनी तिची आत्महत्या असल्याचा पोलिसांचा अंदाज होता. अखेर तिच्या जबानीमध्ये सासरच्यांनी तिला जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तिच्यावर वाशीतील पालिका रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी पहाटे तिचा मृत्यू झाला. त्यानुसार छाया कांबळे हिच्या हत्येप्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२००७ साली तिचे रमेश कांबळे याच्यासोबत लग्न झाले आहे. लग्नापासून ती सासरच्यांसोबत तुर्भे येथील इंदिरानगरमध्ये राहत होती. परंतु लग्नाला ८ वर्षे होवूनही मूल होत नसल्याने सासरच्यांकडून तिचा छळ सुरू होता. अनेकदा तिला मारहाणही केली जायची. अखेर घटनेच्या दिवशी त्यांच्यात पुन्हा वाद झाला असता सासू कमल व दीर उमेश यांनी तिच्यावर रॉकेल ओतून पेटवून दिले. यावेळी छाया हिने स्वत:च्या बचावासाठी पतीकडे धाव घेतली असता त्यानेही तिला ढकलून दिले. यामध्ये तिचा पती रमेश हा देखील भाजला होता. याप्रकरणी दोघांनाही वाशीच्या पालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अखेर शुक्रवारी पहाटे छायाचा मृत्यू झाला. याप्रकरणी दीर उमेश कांबळे याला तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. तर सासू कमल व पती रमेश यांनाही लवकरच अटक केली जाणार असल्याचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रसेन देशमुख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: The bride arrested for murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.