शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

कॅशलेस व्यवहाराला हरताळ

By admin | Published: January 13, 2017 6:28 AM

मोदी सरकारने कॅशलेस व्यवहाराला चालना देण्यासाठी जास्तीत जास्त डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे व्यवहार करण्याचे आवाहन

वैभव गायकर / पनवेलमोदी सरकारने कॅशलेस व्यवहाराला चालना देण्यासाठी जास्तीत जास्त डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे व्यवहार करण्याचे आवाहन देशवासीयांना केले आहे. याकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून ‘कॅशलेस गावां’सारख्या उपक्रमांवरही काम सुरू आहे. मात्र, सर्वसामान्यांसह मध्यम वर्गीय, उच्च वर्गीयांचा संबंध येणाऱ्या वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या डॉक्टर्सनाच कॅशलेस व्यवहारासाठी आवश्यक असलेल्या पीओएस (पॉर्इंट आॅफ सेल) मशिन मिळाल्या नसल्याने तालुक्यात कॅशलेस व्यवहाराला हरताळ लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. गेल्या महिनाभरापासून ही समस्या तालुक्यातील पनवेल, खारघर, कामोठे सारख्या महत्त्वाच्या शहरामधील डॉक्टर्सना भासत आहे. राष्ट्रीयकृत बँकाकडून पीओएस मशिन प्राप्त होत नसल्याने ही समस्या उद्भवत आहे. एकीकडे शासनाकडून कॅशलेस व्यवहारांसाठी मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी केली जात आहे. मात्र, प्रत्यक्षात याकरिता अंमलबजावणी केली जात नाही. पनवेल, नवीन पनवेल, खारघर, कळंबोली, कामोठे याठिकाणी एक हजारापेक्षा जास्त क्लिनिक आहेत. त्यामध्ये होमिओपेथिक, फिजीशियन, डेंटल, आयुर्वेदिक आदी डॉक्टरांचा समावेश आहे. नोटाबंदीनंतर अनेकांचा कल हा कॅशलेस व्यवहाराकडे आहे. डॉक्टरांकडे येणारे पेशंट अनेक वेळा कार्डद्वारेच डॉक्टरांना फी भरण्याला प्राधान्य देतात. मात्र, मशिनच उपलब्ध नसल्याने अनेक वेळा या व्यवहारात अडथळा निर्माण होत आहे. सध्या बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा बचतखात्यातून ४५०० रुपये आहे, तर चालू खात्यातून २४ हजार रुपये आहे. त्यामुळे विविध प्रकारचा व्यवहार करताना अनेकांकडे रोकड उपलब्ध नसते. अशा वेळी उपचारासाठी येणारे रुग्ण हे कार्ड ने व्यवहार करण्यास प्राधान्य दाखवतात. मात्र, मशिन उपलब्ध नसल्याने अनेक रुग्ण हे आपला उपचार पुढे ढकलत असतात. याचाच परिणाम आमच्या व्यवसायावर होत असल्याचे पनवेल येथील दंततज्ज्ञ डॉ. किशोर सोनावणे यांनी सांगितले. खारघरमधील डॉ. वैभव भदाने यांनी सांगितले की, पोस मशिनसाठी आम्हाला अनेक वेळा बँकेत फेऱ्या माराव्या लागत आहेत. चालू खाते उघडण्यासाठी आमच्याकडून आयटी फाइल्स, डिग्री, रजिस्टे्रशन, आदींसह गुमास्ता लायसन्सची मागणी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, आम्ही कोणत्याही प्रकारच्या वस्तूची विक्री करत नसल्यामुळे गुमास्ता लायसन्सची मागणी आमच्यासाठी जाचक आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार डॉक्टर्सना गुमास्ता लायसन्स बाबत सूट देणे गरजेचे आहे. मात्र, तरीही बँकाकडून याबाबत मागणी केली जाते. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मशिनचा तुटवडा असल्याचे उत्तर बँकाकडून देण्यात येत आहे. असे असेल तर कॅशलेस व्यवहार होणार कसा? हा सवाल डॉक्टर्स कडून विचारला जात आहे.