नवी मुंबई मनपाचा 3151 कोटी 93 लाख रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीत सादर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 01:07 PM2018-02-20T13:07:27+5:302018-02-20T13:31:52+5:30
नवी मुंबई- नवी मुंबई महानगरपालिकेचा 3151 कोटी 93 लाख रूपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीत सादर झाला. 1 कोटींचा शिलकी अर्थसंकल्प सादर करण्यात आलंय. आर्थिक दिवाळ खोरीत गेलेली नवी मुंबई महापालिकेला तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे आणि आत्ताचे आयुक्त डॉ. रामास्वामी यांनी श्रीमंत महापालिकेच्या यादीत आणून बसवलं होतं.
महापालिकेच्या ठेवी 2 हजार कोटींची वर आहेत.मुंबई वगळता सध्या सर्वात जास्त ठेवी असणारी महापालिका म्हणून राज्यात नवी मुंबई महापालिकेकडे बघितले जात. कडक शिस्तीचे आणि पारदर्शक कारभार हाताळणारे आयुक्त रामास्वामी यांनी या बजेटमधून सर्वसामान्य नवी मुंबईकरांना केंद्रस्थानी ठेवण्यात आलं असल्याचं आयुक्त डॉ रामास्वामी यांनी सांगितलंय. बजेटमध्ये मालमत्ता, पाणीकरात कोणतीही वाढ करण्यात आली नाही.
अर्थसंकल्प वैशिष्ट्ये
*गावठाण झोपडपट्टी परिसराच्या विकासावर भर.
*पालिकेच्या सर्व कार्यालयात हिरकणी कक्ष स्थापन होणार.
*संपूर्ण शहरात Led बल्ब बसविण्यात.
*शहरात सायन्स सेंटर व सायंटिफिक म्युझीयम उभारण्यात
* नेरूळ सेक्टर 21 व 28 ला जोडणारा उड्डाणपूल बांधणार.
*ई गव्हर्नन्स वर भर
* LIDAR तंत्राचा वापर करून मालमत्तांचे सर्वेक्षण.
* पालिका मेडिकल कॉलेज सुरू करणार
* शहरात जनऔषधी केंद्र सुरू करणार.
*नाईट कापले, व्यवसाय प्रशिक्षण वर्ग सुरू करणार.
*कचरामुक्त शहर संकल्पना राबविनार
* नवीन पाच ग्रंथालय सुरू होणार