खाडीपुलावर सुविधांची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 03:06 AM2019-09-30T03:06:23+5:302019-09-30T03:06:36+5:30

देखभाल दुरुस्तीच्या कारणावरून वाशी खाडीपुलाचे अधिकार सार्वजनिक बांधकाम खात्याकडून काढून राज्य रस्ते विकास महामंडळाकडे सोपवण्यात आले आहेत.

 Build facilities on the creek bridge | खाडीपुलावर सुविधांची वानवा

खाडीपुलावर सुविधांची वानवा

Next

- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : देखभाल दुरुस्तीच्या कारणावरून वाशी खाडीपुलाचे अधिकार सार्वजनिक बांधकाम खात्याकडून काढून राज्य रस्ते विकास महामंडळाकडे सोपवण्यात आले आहेत. मात्र, जरी अधिकाराची खांदेपालट झाली असली, तरीही तिथल्या समस्या मात्र जैसे थे असल्याचे पाहायला मिळत आहे. परिणामी, त्या ठिकाणी वाहतूककोंडीसह अपघातांच्या घटना घडत असून पोलिसांची डोकेदुखी वाढत चालली आहे.
मुंबई व नवी मुंबईला जोडणाऱ्या वाशी येथील खाडीपुलाच्या देखभाल दुरुस्तीचे अधिकार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होते. यादरम्यान पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीची कामे रखडली होती, त्यामुळे रात्रीच्या वेळी खाडीपुलावर अपघातांच्या घटना घडत होत्या. तर टोलनाका परिसरात व पुलावर सातत्याने खड्डेही पडत होते, यामुळे होणारी वाहतूककोंडी ही प्रवाशांसह वाहतूक पोलिसांची डोकेदुखी ठरत होती. तर अशाच प्रकारातून वर्षभरापूर्वी घडलेल्या एका अपघातप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे. यासंदर्भात सातत्याने होणाºया तक्रारींमुळे शासनाने वाशी टोलनाक्याच्या देखभाल दुरुस्तीच्या अधिकारात खांदेपालट केली आहे. त्यानुसार मागील पाच महिन्यांपासून या पुलावरील सिव्हिल व विद्युत दोन्ही कामांचे अधिकार पीडब्ल्यूडी कडून एमएसआरडीसीकडे सोपवण्यात आले आहेत, यामुळे खाडीपुलावरील समस्या संपुष्टात निघतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.
प्रत्यक्षात मात्र सदर मार्गाने प्रवास करणाऱ्यांच्या अपेक्षा भंग झाल्या आहेत, त्यामुळे ‘पुलाचे कारभारी बदलले तरीही कारभार मात्र जसाच्या तसाच’ असल्याची टीका होऊ लागली आहे.
खाडीपुलाच्या सुरक्षा कठड्याची उंची कमी असल्याने त्यावरून आत्महत्येचे प्रकार घडत आहेत, तर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून त्या ठिकाणी वाहनांची गती मंदावून वाहतूककोंडी होत आहे. त्यापैकी मुंबईकडे जाणाºया मार्गावर अधिक खड्डे असल्याने अनेकदा सकाळच्या वेळी खाडीपुलापासून ते वाशीगावापर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. तर पुलावरील पथदिवे केवळ नावालाच असल्याने, रात्रीच्या वेळी पुलावर पुरेसा प्रकाश नसल्याने वाहन चालवताना चालकांचीही कसोटी लागत आहे. त्यामुळे खाडीपुलावर भेडसावणाºया समस्यांचा राग वाहनचालकांकडून वाहतूक पोलिसांवर निघत आहे. अनेकदा टोलनाक्यालगत वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाºया चालकांवर कारवाईची मोहीम राबवली जाते. त्या वेळी चालकांकडून खाडीपुलावरील खड्डे, पथदिवे तसेच टोलनाक्यालगतच्या रस्त्यावरील खड्डे अशा अनेक समस्यांचा पाढा वाचला जात असल्याचीही वाहतूक पोलिसांची खंत आहे.
तर पीडब्ल्यूडीकडे देखभाल दुरुस्तीचे अधिकार असताना किमान तक्रारीनंतर तरी खड्डे बुजवले जायचे असे वाहतूक पोलिसांसह प्रवाशांचे म्हणणे आहे.
वाहतूक पोलिसांकडूनही वेळोवेळी संबंधित अधिकाºयांना कळवण्यात आले आहे. मात्र,
मागील पाच महिन्यांत पूर्णपणे पुलाच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याचा संताप व्यक्त होत आहे. त्यानंतरही पुलावरील गैरसोयी दूर करण्यात होत असलेल्या विलंबाबाबत रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापक अनिलकुमार गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

अपघाताची शक्यता
पुलाच्या वाशीकडे येणाºया मार्गिकेवर उतारालाच दोन टप्प्याच्या कामात फट निर्माण झाली आहे. त्या ठिकाणी कार अथवा दुचाकीचा टायर घासून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. यामध्ये जीवितहानीही होऊ शकते. त्यानंतरही डांबरीकरण व काँक्रीटीकरण यामध्ये तयार झालेली तेथील फट बुजवण्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

पथदिवे गायब
खाडीपुलावर रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश पडावा, याकरिता पथदिवे बसवण्यात आले आहेत. मात्र, अधिकतम वेळा पथदिवे बंद असतात. सध्याही बºयाच कालावधीपासून तिथले पथदिवे बंद आहेत, तर काही ठिकाणचे खांबही नाहीसे झाले आहेत. यावरून खाडीपुलावरील पथदिव्यांच्या कामाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. तर याच कारणावरून पीडब्ल्यूडीकडून हा पूल रस्ते विकास महामंडळाकडे सोपवण्यात आला. मात्र, त्यानंतरही समस्या जैसे थे असल्याचे दिसून येत असल्याने हस्तांतरामागचे नेमके कारण गुलदस्त्यातच असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

Web Title:  Build facilities on the creek bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.