शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
5
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
6
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
7
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
8
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
10
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
11
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
12
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
13
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
14
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
15
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
16
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
17
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
18
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
19
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
20
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?

खाडीपुलावर सुविधांची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 3:06 AM

देखभाल दुरुस्तीच्या कारणावरून वाशी खाडीपुलाचे अधिकार सार्वजनिक बांधकाम खात्याकडून काढून राज्य रस्ते विकास महामंडळाकडे सोपवण्यात आले आहेत.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : देखभाल दुरुस्तीच्या कारणावरून वाशी खाडीपुलाचे अधिकार सार्वजनिक बांधकाम खात्याकडून काढून राज्य रस्ते विकास महामंडळाकडे सोपवण्यात आले आहेत. मात्र, जरी अधिकाराची खांदेपालट झाली असली, तरीही तिथल्या समस्या मात्र जैसे थे असल्याचे पाहायला मिळत आहे. परिणामी, त्या ठिकाणी वाहतूककोंडीसह अपघातांच्या घटना घडत असून पोलिसांची डोकेदुखी वाढत चालली आहे.मुंबई व नवी मुंबईला जोडणाऱ्या वाशी येथील खाडीपुलाच्या देखभाल दुरुस्तीचे अधिकार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होते. यादरम्यान पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीची कामे रखडली होती, त्यामुळे रात्रीच्या वेळी खाडीपुलावर अपघातांच्या घटना घडत होत्या. तर टोलनाका परिसरात व पुलावर सातत्याने खड्डेही पडत होते, यामुळे होणारी वाहतूककोंडी ही प्रवाशांसह वाहतूक पोलिसांची डोकेदुखी ठरत होती. तर अशाच प्रकारातून वर्षभरापूर्वी घडलेल्या एका अपघातप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे. यासंदर्भात सातत्याने होणाºया तक्रारींमुळे शासनाने वाशी टोलनाक्याच्या देखभाल दुरुस्तीच्या अधिकारात खांदेपालट केली आहे. त्यानुसार मागील पाच महिन्यांपासून या पुलावरील सिव्हिल व विद्युत दोन्ही कामांचे अधिकार पीडब्ल्यूडी कडून एमएसआरडीसीकडे सोपवण्यात आले आहेत, यामुळे खाडीपुलावरील समस्या संपुष्टात निघतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.प्रत्यक्षात मात्र सदर मार्गाने प्रवास करणाऱ्यांच्या अपेक्षा भंग झाल्या आहेत, त्यामुळे ‘पुलाचे कारभारी बदलले तरीही कारभार मात्र जसाच्या तसाच’ असल्याची टीका होऊ लागली आहे.खाडीपुलाच्या सुरक्षा कठड्याची उंची कमी असल्याने त्यावरून आत्महत्येचे प्रकार घडत आहेत, तर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून त्या ठिकाणी वाहनांची गती मंदावून वाहतूककोंडी होत आहे. त्यापैकी मुंबईकडे जाणाºया मार्गावर अधिक खड्डे असल्याने अनेकदा सकाळच्या वेळी खाडीपुलापासून ते वाशीगावापर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. तर पुलावरील पथदिवे केवळ नावालाच असल्याने, रात्रीच्या वेळी पुलावर पुरेसा प्रकाश नसल्याने वाहन चालवताना चालकांचीही कसोटी लागत आहे. त्यामुळे खाडीपुलावर भेडसावणाºया समस्यांचा राग वाहनचालकांकडून वाहतूक पोलिसांवर निघत आहे. अनेकदा टोलनाक्यालगत वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाºया चालकांवर कारवाईची मोहीम राबवली जाते. त्या वेळी चालकांकडून खाडीपुलावरील खड्डे, पथदिवे तसेच टोलनाक्यालगतच्या रस्त्यावरील खड्डे अशा अनेक समस्यांचा पाढा वाचला जात असल्याचीही वाहतूक पोलिसांची खंत आहे.तर पीडब्ल्यूडीकडे देखभाल दुरुस्तीचे अधिकार असताना किमान तक्रारीनंतर तरी खड्डे बुजवले जायचे असे वाहतूक पोलिसांसह प्रवाशांचे म्हणणे आहे.वाहतूक पोलिसांकडूनही वेळोवेळी संबंधित अधिकाºयांना कळवण्यात आले आहे. मात्र,मागील पाच महिन्यांत पूर्णपणे पुलाच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याचा संताप व्यक्त होत आहे. त्यानंतरही पुलावरील गैरसोयी दूर करण्यात होत असलेल्या विलंबाबाबत रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापक अनिलकुमार गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.अपघाताची शक्यतापुलाच्या वाशीकडे येणाºया मार्गिकेवर उतारालाच दोन टप्प्याच्या कामात फट निर्माण झाली आहे. त्या ठिकाणी कार अथवा दुचाकीचा टायर घासून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. यामध्ये जीवितहानीही होऊ शकते. त्यानंतरही डांबरीकरण व काँक्रीटीकरण यामध्ये तयार झालेली तेथील फट बुजवण्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.पथदिवे गायबखाडीपुलावर रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश पडावा, याकरिता पथदिवे बसवण्यात आले आहेत. मात्र, अधिकतम वेळा पथदिवे बंद असतात. सध्याही बºयाच कालावधीपासून तिथले पथदिवे बंद आहेत, तर काही ठिकाणचे खांबही नाहीसे झाले आहेत. यावरून खाडीपुलावरील पथदिव्यांच्या कामाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. तर याच कारणावरून पीडब्ल्यूडीकडून हा पूल रस्ते विकास महामंडळाकडे सोपवण्यात आला. मात्र, त्यानंतरही समस्या जैसे थे असल्याचे दिसून येत असल्याने हस्तांतरामागचे नेमके कारण गुलदस्त्यातच असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई