गृहप्रकल्पामध्ये ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डरला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 05:38 AM2017-09-03T05:38:21+5:302017-09-03T05:38:28+5:30
गृहप्रकल्पामध्ये ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी खारघर पोलिसांनी मोनार्च बिल्डर्स कंपनीच्या दोघांना अटक केली आहे.
नवी मुंबई : गृहप्रकल्पामध्ये ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी खारघर पोलिसांनी मोनार्च बिल्डर्स कंपनीच्या दोघांना अटक केली आहे. खारघर येथील लक्झुरिया अपार्टमेंटमध्ये गाळा खरेदीसाठी पैसे देऊनही ताबा न मिळाल्याने ग्राहकाने त्यांच्याविरोधात तक्रार केली होती.
खारघर येथे राहणा-या नरसिंह राठोड यांनी मोनार्च बिल्डर्सचा लक्झुरिया अपार्टमेंटमध्ये गाळा खरेदी केला होता. त्याकरिता मोनार्च बिल्डर्सला ४६ लाख रुपये दिले होते. मात्र सन २०१३पासून त्यांना गाळ्याचा ताबा मिळालेला नव्हता. यासंदर्भात त्यांनी खारघर पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार मोनार्च बिल्डर्सचे अशोक नारायणी, गोपाळ ठाकूर, हसमुख ठाकूर, रोशन ठाकूर, आनंद ठाकूर, सुशील माखीजा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डी. एस. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन शिंदे, हवालदार नितीन पालवे, उमेश नेवारे, किरण म्हात्रे यांच्या पथकाने दोघांना अटक केली. गोपाळ ठाकूर व हसमुख ठाकूर अशी त्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने ४ सप्टेंबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.