बिल्डर कंधारीच्या आत्महत्येचे गूढ लवकरच उलगडणार?

By admin | Published: May 12, 2016 02:25 AM2016-05-12T02:25:46+5:302016-05-12T02:25:46+5:30

स्वराज डेव्हलपर्सचे राज कंधारी यांच्या आत्महत्येचा उलगडा करण्यासाठी पोलीस कसून तपास करत आहेत. कंधारी यांचे व्यावसायिक वाद असल्याचेही निदर्शनास आले आहे

Builder Kandhari's suicide introspection soon? | बिल्डर कंधारीच्या आत्महत्येचे गूढ लवकरच उलगडणार?

बिल्डर कंधारीच्या आत्महत्येचे गूढ लवकरच उलगडणार?

Next

नवी मुंबई : स्वराज डेव्हलपर्सचे राज कंधारी यांच्या आत्महत्येचा उलगडा करण्यासाठी पोलीस कसून तपास करत आहेत. कंधारी यांचे व्यावसायिक वाद असल्याचेही निदर्शनास आले आहे. फसवणूक करणाऱ्यांविरोधात त्यांनी वाशी व ऐरोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे नोंदविले असून त्यांच्याविरोधातही फसवणूक व इतर गुन्हे दाखल आहेत.
बांधकाम व्यावसायिक राज कंधारी यांच्या पार्थिवावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचा कसून तपास करावा या मागणीसाठी शहरातील व्यावसायिकांनी काळ्या फिती लावल्या होत्या. दरम्यान, पोलिसांनी कंधारी यांनी कौटुंबिक कलहामधून की व्यावसायिक वादामुळे आत्महत्या केली याविषयी तपास सुरू केला आहे. कंधारी यांनी २०१४ व १५ मध्ये वाशी व ऐरोली पोलीस स्टेशनमध्ये त्यांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. याशिवाय त्यांच्याविरोधात फ्लॅटची विक्री केल्यानंतर प्रत्यक्ष ताबा न दिल्याप्रकरणी ७ गुन्हे दाखल झाले आहेत. बांधकाम व्यवसायातील पैसे थकविणे, बांधकाम साहित्य परत न देणे, धनादेश न वटल्याचे गुन्हेही दाखल आहेत. बेस्ट चालकाच्या तक्रारीवरून शासकीय कामकाजात अडथळे आणल्याचे गुन्हेही दाखल आहेत. ठाणे आयुक्तालयामधील श्रीनगर पोलीस स्टेशनमध्येही त्यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
कंधारी यांचे चेंबूर, दिघा, उलवे, पनवेल परिसरात इमारतींचे बांधकाम सुरू आहे. घणसोलीमधील प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. याशिवाय दिघा मधील स्मशानभूमीच्या बांधकामाचा ठेकाही त्यांना मिळाला आहे. याशिवाय नैना परिसरामध्येही त्यांनी मोठी गुंतवणूक केली आहे. त्यांची विविध ठिकाणी कामे सुरू आहेत. यामुळे व्यावसायिक व खरेदीचे वाद, कौटुंबिक कलह की दुसऱ्या कारणांनी त्यांनी आत्महत्या केली याचा तपास सुरू आहे.

Web Title: Builder Kandhari's suicide introspection soon?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.