कळव्यात बुलडोझर

By admin | Published: May 13, 2016 02:17 AM2016-05-13T02:17:47+5:302016-05-13T02:17:47+5:30

महापालिकेने अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचा सपाटा सुरूच ठेवला असून गुरुवारी कळव्यात राजकीय नेत्यांच्या कार्यालयांवर कारवाईचा बुलडोझर फिरवला आहे.

Bulldozer in the report | कळव्यात बुलडोझर

कळव्यात बुलडोझर

Next

ठाणे : महापालिकेने अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचा सपाटा सुरूच ठेवला असून गुरुवारी कळव्यात राजकीय नेत्यांच्या कार्यालयांवर कारवाईचा बुलडोझर फिरवला आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. या कारवाईत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कळवा खाडीलगत असलेले कार्यालय, येथील चौकातील शिवसेना शाखा तसेच येऊर जंगलातील चार बड्या बेकायदा बंगल्यांवरही दिवसभरात बुलडोझर फिरवण्यात आला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक बडा नेता तसेच साहित्य वर्तुळात ‘पाटीलकी’ गाजवणाऱ्या एका सरकारी अधिकाऱ्याच्या बंगल्याचादेखील या कारवाईत समावेश आहे.
मुंब्य्रात तब्बल तीन हजारांहून अधिक बांधकामांवर कारवाई केल्यानंतर ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या आदेशानुसार बुधवारी सायंकाळी पोखरण-२ येथील गांधीनगर परिसरातील शिवसेना शाखेवर बुलडोझर फिरवून महापालिकेने राजकीय अतिक्र मणविरोधी कारवाईचा श्रीगणेशा केला. त्यानंतर, सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास येऊरच्या टेकडीवर चार पोकलेन चढवण्यात आले आणि तेथील बंगल्यांवर कारवाई सुरू झाली. ती संपत नाही, तोवर कळव्यातील मुख्य चौकात असलेल्या शिवसेना शाखेचे पाडकाम सुरू करण्यात आले. त्यापाठोपाठ खाडीलगत असलेले जितेंद्र आव्हाड यांचे कार्यालय रिकामे करण्याची कारवाई सुरू झाली. बघताबघता सायंकाळपर्यंत हे कार्यालयही जमीनदोस्त करण्यात आले.
ठाणे महापालिकेच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर राजकीय अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, अशोक रणखांब, अतिक्रमण उपायुक्त अशोक बुरपल्ले, संदीप माळवी यांच्या पथकाने येऊर आणि कळव्यात कारवाई केली. (प्रतिनिधी)

Web Title: Bulldozer in the report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.