शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
3
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
4
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
5
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
6
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
7
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
8
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
9
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
10
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
11
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
12
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
13
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
14
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
15
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
16
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
17
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
18
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
19
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
20
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका

बुलेट ट्रेन आणि मुंबई-बडोदा महामार्ग घेणार ४ हजार झाडांचा बळी; ७०६ झाडांचे होणार पुनर्रोपण, वृक्ष प्राधिकरणाने दिली मंजुरी

By नारायण जाधव | Published: May 12, 2023 9:46 PM

राज्य वृक्ष प्राधिकरण समितीने आपल्या सहाव्या बैठकीत ही मंजुरी दिली आहे...

नवी मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप युतीचे सरकार येताच पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या स्वप्नातील मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासह बहुचर्चित मुंबई- बडोदा महामार्गाच्या कामाने वेग पकडला आहे. यानुसार बुलेट ट्रेन आणि महामार्गाच्या कामात अडथळा ठरणाऱ्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील ४,२५३ वृक्षांची तोड होणार असून ७७६ वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे.

राज्य वृक्ष प्राधिकरण समितीने आपल्या सहाव्या बैठकीत ही मंजुरी दिली आहे. यातील पालघरच्या मोरीवली, वेवूर, नावाळी आणि घोलविरा गावाच्या हद्दीतील ज्या ६८१ झाडांची कत्तल करण्यात येणार आहे, त्याबाबतचा प्रस्ताव नॅशनल हायस्पीड रेल्वे कार्पोरेशन आणि पालघर नगर परिषदेने वृत्तपत्रात यासंबंधीची जाहिरात न देताच पाठवला होता. यामुळे तो तूर्तास परत पाठवून वृत्तपत्रात जनतेच्या माहितीसाठी जाहिरात देऊन परत पाठविण्यास सांगण्यात आले आहे.

या ठिकाणच्या वृक्षांची होणार कत्तल -१- मुंबई- बडोदा महामार्गाच्या कामात वसई- विरार महापालिकेच्या हद्दीतील २९ हेरिटेज वृक्षांसह १,६९८ झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. या वृक्षांचे आयुष्यमान २०,७७५ वर्षे असल्याने त्या बदल्यात तितकीच झाडे लावण्यास वृक्ष प्राधिकरणाने नॅशनल हायवे प्राधिकरणास सांगितले आहे.२ - मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गात वसई- विरार महापालिकेच्या हद्दीतील नऊ हेरिटेज वृक्षांसह १,३६८ वृक्षांची कत्तल होणार आहे. त्यांचे सरासरी आयुष्यमान १४,५८६ वर्षे असल्याने तितकीच झाडे लावण्यास नॅशनल हायस्पीड रेल्वे कार्पोरेशनला सांगितले आहे.३ - मुंबई- बडोदा महामार्गाच्या कामात कुळगाव- बदलापूरच्या आमने ते भोज सेक्शनमधील १,२८५ झाडे बाधित होणार आहेत. यापैकी ५०६ झाडे कायमची ताेडावी लागणार आहेत. तर ७७६ झाडांचे पुनर्रोपण करावे लागणार आहे. या वृक्षांचे आयुष्यमान २१,३६६ वर्षे असल्याने त्या बदल्यात तितकीच झाडे लावण्यास वृक्ष प्राधिकरणाने नॅशनल हायवे प्राधिकरणास सांगितले आहे.

पुनर्रोपित ५६ हजार वृक्षांचे जिओ टॅगिंग सक्तीचेराज्य वृक्ष प्राधिकरण समितीने या वृक्ष कत्तलीस मंजुरी देताना बाधित वृक्षांच्या आयुष्यमानानुसार ज्या एकूण ५६,७२७ वृक्षांची लागवड करण्यास सांगितले आहे, त्या वृक्षांच्या रोपांची उंची कमीतकमी सहा फूट असणे आवश्यक आहे. तसेच पुनर्रोपित सर्व झाडांचे जिओ टॅगिंग करून त्यांचे सात वर्षांपर्यंत संवर्धन करण्याचे निर्देश राज्य वृक्ष प्राधिकरण समितीने दिले आहेत. 

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनMumbaiमुंबईGujaratगुजरात