बुलेट ट्रेनला हव्यात ११ हजार कोटींच्या १० डब्यांच्या २४ गाड्या

By नारायण जाधव | Published: July 7, 2023 03:55 PM2023-07-07T15:55:54+5:302023-07-07T15:59:10+5:30

जपानी कंपन्यांची असणार मक्तेदारी : महाराष्ट्रातील कामे जोमाने सुरू

bullet train needs 24 trains of 10 coaches worth 11 thousand crores | बुलेट ट्रेनला हव्यात ११ हजार कोटींच्या १० डब्यांच्या २४ गाड्या

बुलेट ट्रेनला हव्यात ११ हजार कोटींच्या १० डब्यांच्या २४ गाड्या

googlenewsNext

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : मुंबई-अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या देशातील पहिल्या सुपरफास्ट बुलेट ट्रेन मार्गाचे काम वेगाने सुरू असून, आता यासाठी एनएचएसआरसीएल अर्थात नॅशनल हायस्पीड रेल्वे काॅर्पोरेशनला यासाठी १० डबे असलेल्या शिंकानसेन तंत्रज्ञानावर आधारित २४ गाड्या हव्या आहेत. याचा अंदाजित खर्च ११ हजार कोटींवर असणार आहे.

या सर्व गाड्या शिंकानसेन तंत्रज्ञानावर आधारित २४ ई-५ सिरीजच्या असणार आहेत. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरच्या गुजरात राज्यातील वापी ते साबरमती या ३४९ किमी मार्गावर २०२७ पर्यंत पहिली बुलेट ट्रेन सुरू करण्याचा केंद्र सरकारचा निर्धार आहे. प्रत्येक शिंकानसेन ट्रेनसेटमध्ये १० डबे असतील आणि त्यांची आसन क्षमता ६९० प्रवासी असेल. भारतातील अतिउष्ण हवामान आणि प्रचलित धूळ, वादळवारा यासारख्या भौगोलिक आणि वातावरणीय बदलानुसार नॅशनल हायस्पीड काॅर्पोरेशनने सांगितल्यानुसार या २४ गाड्यांमध्ये हवे ते बदल करून द्यावेत, अशी अट घालून देणार आहे. शिवाय हे डब्यात आधुनिक आसन व्यवस्था, प्रसाधनगृह, लहान मुलांसाठी चेंजिंग रूम असणार आहे.

जपानी कंपन्यांचे असणार वर्चस्व

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प ५०८ किमीचा असून त्यासाठी १.८ लाख कोटी खर्च अपेक्षित आहे. हे संपूर्ण अर्थसहाय्य करण्यास जापान इंटरनॅशनल काॅर्पोरेशन अर्थात जायकाने सहमती दर्शवून तसा करार एनएचएसआरसीएलसोबत केला आहे. या करारात जायकाने मुंबई-अहमदाबाद मार्गावर ज्या बुलेट ट्रेन लागणार आहेत, त्या जापान निर्मित असाव्यात, त्यात केवळ जपानी कंपन्यांना निविदा प्रक्रियेत भाग घेण्याची परवानगी असेल, विशेषत: हिताची रेल आणि कावासाकी हेवी इंडस्ट्रिज अशा ट्रेनसेट्सची निर्मिती करणाऱ्या काही जपानी कंपन्याच, असाव्यात अशी एक प्रमुख अट आहे. यामुळे भारतीय बुलेट ट्रेनमध्ये जापानी कंपन्यांचीच मक्तेदारी असेल, हे आता स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्रातील कामांची प्रगती

१ - गेल्याच महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गातील महाराष्ट्रातील सर्वांत मोठा टप्पा असलेल्या पॅकेज-३ मधील ठाणे जिल्ह्यातील शीळफाटा ते पालघर जिल्ह्यातील गुजरात सीमेपर्यंतच्या झरोली हा १३५.४५ किलोमीटरचा उन्नत मार्ग बांधण्याचे कंत्राट एल ॲन्ड टी कंपनीला दिले आहे. एल ॲन्ड टी कंपनीची निविदा १५,६९७ कोटींची असून या बांधकामांत या मार्गावरील महाराष्ट्रातील ठाणे, विरार आणि बोईसर या तीन उन्नत स्थानकांचाही समावेश आहे.

२ - ठाणे खाडीसह बीकेसी ते शीळफाटा दरम्यानच्या २१ किमीच्या देशातील समुद्राखालील पहिल्या बोगद्याचे काम ॲफकॉन्स कन्स्ट्रक्शन्स ६३९७ कोटी खर्चून करणार आहे. हा बोगदा २०२८ पर्यंत दृष्टिपथात येणार आहे.

३ - मुंबईतील बीकेसी येथील भूमिगत स्थानकाची एमएईआयएल-एचसीसी कंपनीची ३६८१ कोटींची निविदा मान्य केल्यानंतर या भूमिगत स्थानकाचे काम सुरू झाले आहे. ४.९ हेक्टरवर हे स्थानक तीन मजली असून यात फलाटांची लांबी ४१४ मीटर असून येथून १६ काेचची बुलेट ट्रेन ये-जा करू शकेल.

४ - ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्याच्या भारोडी आणि अंजूर गावाजवळील ६० हेक्टर जमिनीवर हा डेपो बांधण्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे.

Web Title: bullet train needs 24 trains of 10 coaches worth 11 thousand crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.