नवी मुंबई : शिक्रापूरमधून कलिंगड घेऊन एपीएमसीमध्ये आलेल्या शेतकºयास व्यापाºयाने कमी मोबदला दिल्याचे निदर्शनास आले होते. या प्रकरणी शेतकरी संघटनेने आवाज उठविताच व्यापाºयाने शेतकºयास २४ हजार ७०० रुपये घरी नेऊन दिले आहेत.
शेतकरी विक्रम रासकर यांनी ६ आॅक्टोबरला त्यांच्याकडील अडीच टन कलिंगड मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमधील व्यापारी नाना कदम यांच्याकडे पाठवले होते. फोनवरून चर्चा केली असता २५ रुपये बाजारभाव मिळवून दिला जाईल, असे सांगण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात मार्केटमध्ये आल्यानंतर त्यांना कमी बाजारभाव देण्यात आला. या अन्यायाविषयी विक्रम यांनी शेतकरी संघटनेने अध्यक्ष अनिल घनवट यांच्याकडे तक्रार केली होती. फोनवरून मांडलेल्या कैफियतचे फोन रेकॉर्डिंग राज्यभर व्हायरल झाले होते. शेतकºयाला न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी संघटनेने पाठपुरावा सुरू केला होता. मुंबई बाजार समितीमध्ये हत्ता पद्धत सुरू असल्याचे व कडता कपात सुरू असल्याचेही निदर्शनास आले होते.कडता कपात बंद करण्याची मागणीशेतकरी संघटनेने आवाज उठविताच व्यापाऱ्याने शेतकऱ्यास २४ हजार ७०० रुपये परत केले आहेत. सर्व रक्कम शेतकºयास त्याच्या घरपोच देण्यात आली आहे. हत्ता पद्धत व कडता कपात बंद करण्याची मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.