स्मशानभूमीत सुविधांचा बोजवारा; दफनभूमीत मोबाइलच्या टॉर्चने विधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 11:49 PM2019-07-24T23:49:24+5:302019-07-24T23:49:30+5:30

बर्निंग स्टँडची दुरवस्था

Burial of facilities in the cemetery | स्मशानभूमीत सुविधांचा बोजवारा; दफनभूमीत मोबाइलच्या टॉर्चने विधी

स्मशानभूमीत सुविधांचा बोजवारा; दफनभूमीत मोबाइलच्या टॉर्चने विधी

googlenewsNext

योगेश पिंगळे

नवी मुंबई : नेरु ळ सेक्टर २ मधील मध्यवर्ती स्मशानभूमीत विविध समस्यांचा बोजवारा उडाला आहे. स्मशानभूमीतील बर्निंग स्टँडची दुरवस्था झाली असून दगडांच्या आधाराने स्टँड उभे करण्यात आले आहेत. तसेच दफनभूमीतील विद्युत खांब बंद असून रात्रीचा काळोख पसरत असल्याने मोबाइलच्या टॉर्चच्या प्रकाशात विधी करावे लागत आहेत. या सर्व प्रकाराकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असून नागरिकांना विविध गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.

२१ व्या शतकातील शहर म्हणून नवी मुंबई शहराची ओळख आहे. शहरात नागरिकांच्या सोयी-सुविधांची अनेक महत्त्वाची अत्याधुनिक कामे करण्यात आली असून यामुळे शहराचा नावलौकिक देखील वाढला आहे. शहरातील प्रत्येक नोडमध्ये महापालिकेच्या माध्यमातून मध्यवर्ती स्मशानभूमी बांधण्यात आल्या आहेत. तसेच स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी लाकूड, गोवऱ्या, मीठ, डिझेल आदी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत; परंतु देण्यात आलेल्या सेवा सुविधांमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या असून सुविधा अपुºया पडू लागल्या आहेत याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. नेरु ळ सेक्टर २ मधील मध्यवर्ती स्मशानभूमीमधील बर्निंग स्टँड मोडकळीस आले आहेत. अनेक वेळा अंत्यविधी सुरू असताना लाकडे कोसळण्याच्या घटना घडत आहेत. प्रशासनाच्या माध्यमातून स्टँडच्या दुरु स्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. विधी करण्यासाठी दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने स्टँडला दगडांचा आधार देऊन उभे करण्यात आले आहे. याच स्मशानभूमीमधील दफनभूमीमध्ये एक विद्युत खांब आहे. सदर विद्युत खांब नादुरु स्त असून रात्री अनेक वेळा बंद असतो. रात्री दफनविधी करताना काळोख असल्याने मोबाइलच्या टॉर्चचा आधार घेऊन विधी करण्याची वेळ नागरिकांवर आली असून आजवर अनेक विधी मोबाइल टॉर्चच्या उजेडात करण्यात आले आहेत. या स्मशानभूमी परिसरात एका बाजूला मलनि:सारण केंद्र असून एका बाजूला खाडी आणि नाले आहेत त्यामुळे परिसरात सापांचा वावर मोठ्या प्रमाणावर असून विद्युत पुरवठा बंद असल्याने विधीसाठी येणाºया नागरिकांच्या आणि या ठिकाणी काम करणाºया कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Web Title: Burial of facilities in the cemetery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.