नवी मुंबई : स्वातंत्र्य दिनापासून नवी मुंबईमधील दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. सम-विषम तारखेस व्यवसाय सुरू ठेवण्याची अट रद्द करण्यात आली आहे. यामुळे व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला असला, तरी अद्याप मॉल्ससह जीम, स्विमिंग पूल बंदच ठेवण्यात येणार आहेत.नवी मुंबईमध्ये अनलॉक सुरू झाल्यापासून शहरातील दुकाने सुरू करण्यात आली होती, परंतु रस्त्याच्या एका बाजूची दुकाने एका दिवशी सुरू करता येत होती. सम-विषम तारखेच्या अटीमुळे आठवड्यातून तीन ते चार दिवसच व्यापार करता येत होता. सायंकाळी पाचनंतर दुकाने बंद करावी लागत होती. यामुळे व्यवसाय होत नव्हता. सर्व व्यापारी संघटनांनी दुकाने नियमित सुरू करण्याची मागणी केली होती. नवी पुनर्वसन सामाजिक संघटनेने यासाठी आंदोलनही केले होते. या मागणीची दखल घेऊन आयुक्त अभिजीत बांगर यांनी सम-विषमची अट काढून टाकली असून, व्यवसाय सायंकाळी पाचऐवजी सातपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.
नवी मुंबईतील व्यावसायिकांना सायंकाळी सातपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचे स्वातंत्र्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 1:23 AM