शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

मार्जिनल स्पेसवरील अतिक्रमण पुन्हा जैसे थे; व्यावसायिकांवर कारवाईचा धाक दोन तासांपुरता

By सूर्यकांत वाघमारे | Published: December 21, 2023 6:06 PM

गुन्हे दाखल करण्याची मागणी

नवी मुंबई : सानपाडा येथे व्यावसायिकांनी बळकावले मार्जिनल स्पेस मोकळे करण्यात प्रशासन अपयशी पडताना दिसत आहे. पालिकेने दंडात्मक कारवाई केल्यानंतर दोन तासात पुन्हा दुकानाबाहेरील मोकळ्या जागेत बाकडे मांडले जात आहेत. यावरून व्यावसायिकांवर केवळ दोन तासांकरिता पालिकेच्या कारवाईचा धाक राहत असल्याचे स्पष्ट होत आहे. 

सानपाडा स्थानकाबाहेरच्या मुख्य मार्गावर वाहतुकीची व पादचाऱ्यांची कोंडी होत आहे. परिसरातील व्यावसायिकांकडून सरसकट मार्जिनल स्पेसचा वापर होताना दिसत आहे. त्याच ठिकाणी अन्न पदार्थ शिजवण्यासह इतर अनेक उद्योग चालत आहेत. यामुळे ग्राहकांची वाहने रस्त्यावर तर ग्राहक पदपथांवर गर्दी करत आहेत. याचा नाहक त्रास पादचाऱ्यांना करावा लागत आहे. तर तुर्भे अथवा एपीएमसीकडे जाण्यासाठी सानपाडा स्थानकातून बाहेर पडताच नजरेस पडणारे हे चित्र पाहून अनेकजण मार्ग बदलत आहेत. ज्या इमारतींच्या तळाशी गाळ्यांमध्ये हा प्रकार चालत आहे, त्या सोसायटींनी देखील व्यावसायिकांना मार्जिनल स्पेस न बळकावण्याच्या लेखी सूचना केल्या आहेत. त्यानंतरही दुपटीने नफ्याच्या उद्देशाने एका परवान्यावर अनेक जोडधंदे करणारे व्यावसायिक कोणाला जुमानत नसल्याचे यावरून दिसून येत आहे.

बुधवारी तुर्भे विभाग कार्यालयाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने त्याठिकाणी कारवाई केली. परंतु पथकाने पाठ फिरवताच दोन तासात परिस्थिती जैसे थे पहायला मिळाली. यावरून त्यांच्यावर पालिकेच्या कारवाईचा देखील धाक राहिला नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे संबंधित व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे. 

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाNavi Mumbaiनवी मुंबई