करंजा बंदराचा व्यवसायिकांनी वापर सुरू करावा, मच्छीमार संस्थेचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 04:03 PM2023-08-10T16:03:08+5:302023-08-10T16:03:38+5:30

१३ वर्षांपूर्वी या बंदराचा खर्च ६४ कोटी रुपये होता.मात्र कामाला झालेला विलंब आणि काही तांत्रिक अडचणींमुळे बंदराच्या खर्चात अडीच पटीने वाढला असून १५० कोटींपर्यंत पोहोचला आहे.

Businessmen should start using Karanja port, fishermen's organization appeals | करंजा बंदराचा व्यवसायिकांनी वापर सुरू करावा, मच्छीमार संस्थेचे आवाहन

करंजा बंदराचा व्यवसायिकांनी वापर सुरू करावा, मच्छीमार संस्थेचे आवाहन

googlenewsNext

मधुकर ठाकूर

उरण : मुंबई बंदरावरील ताण कमी करण्यासाठी १५० कोटी रुपये खर्चून रखडत-रखडत उभारण्यात येत असलेल्या करंजा मच्छीमार बंदर मच्छीमारांनी वापर करण्याचा निर्णय करंजा मच्छीमार संस्थेने घेतला  आहे. त्यामुळे या अत्याधुनिक करंजा बंदराचा वापर राज्यातील सर्वच मच्छीमार व मासळी व्यवसायिकांनी करण्याचे आवाहन करंजा मच्छीमार सहकारी संस्थेच्यावतीने अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनी केले आहे.
  
राज्यातील मासळी व्यावसायिक व मच्छीमारांसाठी पकडलेली मासळी बंदरात उतरवणे, खरेदी-विक्री, लिलाव, आयात-निर्यात करण्यासाठी मुंबईतील ससुनडॉक व कसारा या दोनच बंदरांचा पर्याय उपलब्ध आहे.यापैकी भाऊचा धक्का जवळील कसारा बंदर हे पुर्णपणे फक्त गुजराती मच्छीमारांसाठी वापरण्यासाठी देण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील लाखो मच्छीमारांसाठी उरलेल्या एकमेव ससुनडॉक बंदराचाच आधार आहे.मात्र सुमारे ७०० ते ७५० क्षमतेचे ससुनडॉक बंदर मच्छीमारांसाठी अपुरे पडत असल्याने ससुनडॉक बंदरावरील वाढता ताण लक्षात घेऊन १३ वर्षांपुर्वी करंजा येथील बंदरात १००० मच्छीमार बोटींच्या क्षमतेचे अत्याधुनिक सर्व सोयी सुविधांयुक्त नवीन बंदर उभारण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती.

१३ वर्षांपूर्वी या बंदराचा खर्च ६४ कोटी रुपये होता.मात्र कामाला झालेला विलंब आणि काही तांत्रिक अडचणींमुळे बंदराच्या खर्चात अडीच पटीने वाढला असून १५० कोटींपर्यंत पोहोचला आहे. या वाढलेल्या खर्चाची केंद्र व राज्य सरकारने अर्धी-अर्धी म्हणजेच ७५-७५ कोटी जबाबदारी उचलली असून त्यानंतरच निधी अभावी रखडलेल्या करंजा मच्छीमार बंदराच्या कामाला सुरुवात झाली आहे.मात्र त्यानंतरही बंदराचे काम अद्यापही रखडत- रखडत सुरू आहे.त्यानंतरही जेट्टीची उंची दीड -दोन फुटांपर्यंत वाढविण्यासाठी आणखी काही कोटींच्या निधीची कमतरता भासत आहे.बंदर कार्यान्वित करण्याच्या अनेक घोषणाही झाल्या.मात्र बंदराचे काम ठेकेदाराला दंड ठोठावण्यात आल्यानंतरही हलगर्जीपणामुळे अद्यापही अनेक कामे पुर्णत्वास गेलेले नाहीत.आणखी किती कालावधी लागेल याचीही माहिती नाही.

त्यामुळे बंदरांतील कामे पूर्ण झाली नसतानाही केवळ मच्छीमारांच्या हित लक्षात घेत करंजा मच्छीमार सहकारी संस्थेने करंजा मच्छीमार बंदरातुनच आगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून  कामकाज सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्वच मासळी व्यावसायिक व मच्छीमारांसाठी पकडलेली मासळी बंदरात उतरवणे, खरेदी-विक्री, लिलाव, आयात-निर्यात करण्यासाठी या बंदराचा वापर करण्याचे आवाहन करंजा मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनी केले आहे.
 
दरम्यान महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने बंदराचे काम काही अंशी झाले नसल्याने अद्यापही तरी करंजा मच्छीमार बंदर मत्स्यव्यवसाय विभागाच्या ताब्यात दिले नसल्याची माहिती बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
 

Web Title: Businessmen should start using Karanja port, fishermen's organization appeals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.