शहरं
Join us  
Trending Stories
1
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
2
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
3
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
4
मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; २ नेते पक्ष सोडणार, अपक्ष लढण्याची तयारी
5
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?
6
शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी
7
मुंबईतल्या ३ जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर; मुस्लीम चेहरा उतरवला रिंगणात
8
भयंकर! "सर, आमचा जीव वाचवा..."; गुंडांच्या भीतीने शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर जोडले हात
9
IND vs NZ : "...म्हणूनच आमचा पराभव झाला, मी दुखावलोय", कर्णधार रोहित शर्माची प्रामाणिक कबुली
10
दिग्गजांना आस्मान दाखवण्यासाठी पवारांचा डाव: बीडमध्ये पुन्हा क्षीरसागरच; भुजबळ, झिरवळांविरोधात कोणाला संधी?
11
IND vs NZ : शिकाऱ्यांची शिकार झाली! आपल्याच घरात भारताचा दारुण पराभव; टीम इंडिया कुठे चुकली?
12
टीम इंडियाला घरच्या मैदानात धोबीपछाड; न्यूझीलंडनं पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकत रचला इतिहास
13
न्यूझीलंड विरुद्ध सलग दोन पराभव; WTC फायनल गाठण्यासाठी टीम इंडियासमोर मोठं चॅलेंज
14
अखेर Andheri East Assembly चा महायुतीचा उमेदवार ठरला; भाजपचा नेता शिंदेंच्या सेनेतून लढणार
15
'दरवेळी ऑफर देतात'; बाळासाहेब थोरात-संजय राऊतांबद्दल देशमुखांचा गौप्यस्फोट
16
कडक सॅल्यूट! हातावरच्या रेषा नशीब ठरवत नाहीत...; डिलिव्हरी बॉयचा डोळे पाणावणारा Video
17
ऐन निवडणुकीत महाराष्ट्रात नवीन राजकीय पक्षाचा उदय; २८८ जागा लढवणार, काय आहे नाव?
18
'या' भाषा भारतात सर्वाधिक बोलल्या जातात; तुम्हाला माहितीये का?
19
मी ध्यानचंद खेल रत्न पुरस्कारासाठी पात्र आहे का? मनूची पोस्ट; चाहत्यांनी उडवली खिल्ली मग...
20
छत्रपती संभाजीराजेंचा मनोज जरांगेंकडे युतीचा प्रस्ताव; अपक्ष उमेदवारीचे सांगितले तोटे

करंजा बंदराचा व्यवसायिकांनी वापर सुरू करावा, मच्छीमार संस्थेचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 4:03 PM

१३ वर्षांपूर्वी या बंदराचा खर्च ६४ कोटी रुपये होता.मात्र कामाला झालेला विलंब आणि काही तांत्रिक अडचणींमुळे बंदराच्या खर्चात अडीच पटीने वाढला असून १५० कोटींपर्यंत पोहोचला आहे.

मधुकर ठाकूर

उरण : मुंबई बंदरावरील ताण कमी करण्यासाठी १५० कोटी रुपये खर्चून रखडत-रखडत उभारण्यात येत असलेल्या करंजा मच्छीमार बंदर मच्छीमारांनी वापर करण्याचा निर्णय करंजा मच्छीमार संस्थेने घेतला  आहे. त्यामुळे या अत्याधुनिक करंजा बंदराचा वापर राज्यातील सर्वच मच्छीमार व मासळी व्यवसायिकांनी करण्याचे आवाहन करंजा मच्छीमार सहकारी संस्थेच्यावतीने अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनी केले आहे.  राज्यातील मासळी व्यावसायिक व मच्छीमारांसाठी पकडलेली मासळी बंदरात उतरवणे, खरेदी-विक्री, लिलाव, आयात-निर्यात करण्यासाठी मुंबईतील ससुनडॉक व कसारा या दोनच बंदरांचा पर्याय उपलब्ध आहे.यापैकी भाऊचा धक्का जवळील कसारा बंदर हे पुर्णपणे फक्त गुजराती मच्छीमारांसाठी वापरण्यासाठी देण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील लाखो मच्छीमारांसाठी उरलेल्या एकमेव ससुनडॉक बंदराचाच आधार आहे.मात्र सुमारे ७०० ते ७५० क्षमतेचे ससुनडॉक बंदर मच्छीमारांसाठी अपुरे पडत असल्याने ससुनडॉक बंदरावरील वाढता ताण लक्षात घेऊन १३ वर्षांपुर्वी करंजा येथील बंदरात १००० मच्छीमार बोटींच्या क्षमतेचे अत्याधुनिक सर्व सोयी सुविधांयुक्त नवीन बंदर उभारण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती.

१३ वर्षांपूर्वी या बंदराचा खर्च ६४ कोटी रुपये होता.मात्र कामाला झालेला विलंब आणि काही तांत्रिक अडचणींमुळे बंदराच्या खर्चात अडीच पटीने वाढला असून १५० कोटींपर्यंत पोहोचला आहे. या वाढलेल्या खर्चाची केंद्र व राज्य सरकारने अर्धी-अर्धी म्हणजेच ७५-७५ कोटी जबाबदारी उचलली असून त्यानंतरच निधी अभावी रखडलेल्या करंजा मच्छीमार बंदराच्या कामाला सुरुवात झाली आहे.मात्र त्यानंतरही बंदराचे काम अद्यापही रखडत- रखडत सुरू आहे.त्यानंतरही जेट्टीची उंची दीड -दोन फुटांपर्यंत वाढविण्यासाठी आणखी काही कोटींच्या निधीची कमतरता भासत आहे.बंदर कार्यान्वित करण्याच्या अनेक घोषणाही झाल्या.मात्र बंदराचे काम ठेकेदाराला दंड ठोठावण्यात आल्यानंतरही हलगर्जीपणामुळे अद्यापही अनेक कामे पुर्णत्वास गेलेले नाहीत.आणखी किती कालावधी लागेल याचीही माहिती नाही.

त्यामुळे बंदरांतील कामे पूर्ण झाली नसतानाही केवळ मच्छीमारांच्या हित लक्षात घेत करंजा मच्छीमार सहकारी संस्थेने करंजा मच्छीमार बंदरातुनच आगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून  कामकाज सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्वच मासळी व्यावसायिक व मच्छीमारांसाठी पकडलेली मासळी बंदरात उतरवणे, खरेदी-विक्री, लिलाव, आयात-निर्यात करण्यासाठी या बंदराचा वापर करण्याचे आवाहन करंजा मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनी केले आहे. दरम्यान महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने बंदराचे काम काही अंशी झाले नसल्याने अद्यापही तरी करंजा मच्छीमार बंदर मत्स्यव्यवसाय विभागाच्या ताब्यात दिले नसल्याची माहिती बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईfishermanमच्छीमार