पोटनिवडणुकीची रणधुमाळी थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2016 12:47 AM2016-04-16T00:47:53+5:302016-04-16T00:47:53+5:30
महापालिकेच्या प्रभाग ६ मधील पोटनिवडणुकीसाठीचा प्रचार आज थांबला. राष्ट्रवादी विरोधात सर्व पक्ष असे लढतीचे स्वरूप असून रविवारी मतदान व मतमोजणी होणार आहे.
नवी मुंबई : महापालिकेच्या प्रभाग ६ मधील पोटनिवडणुकीसाठीचा प्रचार आज थांबला. राष्ट्रवादी विरोधात सर्व पक्ष असे लढतीचे स्वरूप असून रविवारी मतदान व मतमोजणी होणार आहे.
राष्ट्रवादी काँगे्रसच्या नगरसेविका संगीता राजबली यादव यांचे जातप्रमाणपत्र बोगस निघाल्यामुळे नगरसेवकपद रद्द करण्यात आले. याठिकाणी सुरू असलेल्या पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला शह देण्यासाठी काँगे्रस, शिवसेना व भारतीय जनता पक्ष एकत्र येवून अपक्ष उमेदवारास पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रामअशिष यादव यांचे वर्चस्व आहे. विरोधकांनी त्यांची दहशत मोडून काढण्यासाठी आम्ही मैदानात उतरलो असल्याचे मत व्यक्त केले आहे. राष्ट्रवादीने आतापर्यंत केलेल्या कामांवर लक्ष केंद्रित केले होते. शुक्रवारी पाच वाजता प्रचार थांबला आहे. आता सर्वपक्षीयांनी व्यक्तिगत संपर्क व सोशल मीडियाचा वापर सुरू केला आहे.
शहरातील संवेदनशील प्रभागांमध्ये यादवनगरचा समावेश होतो. यामुळे पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. रविवारी मतदान झाल्यानंतर लगेच मतमोजणीही होणार आहे. पुढील २४ तासात मतदारांना पैसे वाटप होणार नाही याकडे लक्ष दिले जात आहे. मतदान व मतमोजणीच्यावेळी कोणताही अनुचित प्रकार होवू नये यासाठी विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)