सीएए, एनआरसीविरोधात निषेध; पनवेलमध्ये काँग्रेस भवनवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 01:16 AM2019-12-30T01:16:55+5:302019-12-30T01:17:15+5:30

तणाव निर्माण केल्याचा आरोप

CAA, protest against NRC | सीएए, एनआरसीविरोधात निषेध; पनवेलमध्ये काँग्रेस भवनवर मोर्चा

सीएए, एनआरसीविरोधात निषेध; पनवेलमध्ये काँग्रेस भवनवर मोर्चा

googlenewsNext

पनवेल : पनवेल काँग्रेस भवन येथे शनिवारी काँग्रेस स्थापना दिवस साजरा करण्यात आला. यावेळी काँग्रेस भवन येथे सीएए, एनआरसीच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला.

देशामध्ये भाजप सरकारविरोधात तणावाचा वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकत्त्व संशोधन कायदा व एनआरसीसारखे कायदे अमलात आणून समाजामध्ये तणावाचे वातावरण निर्माण केले जात आहे. तसेच जामिया मिलिया, अलिगड विद्यापीठ, जेएनयूमधील विद्यार्थ्यांना नाहक मारहाण केली जात असल्याच्या निषेधार्थ पनवेल शहर जिल्हा काँग्रेस, तालुका काँग्रेस, रायगड जिल्हा व पनवेल विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने पनवेल काँग्रेसभवन ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हा अध्यक्ष आर.सी. घरत, कार्याध्यक्ष सुदाम पाटील, पनवेल शहर अध्यक्ष लतीफ शेख, प्रवक्ते मोहन गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तालुका अध्यक्ष महादेव कटेकर, भरत म्हात्रे, वसंत काठवले, शशिकांत बांदोडकर, अरविंद सावलेकर, रमेश राव, विश्वजित पाटील, गजानन पाटील, बगाराम रोडपालकर, सुधीर मोरे, विश्वनाथ चौधरी, राजीव चौधरी, डॉ. राजेश घरत, अरुण ठाकूर, डॉ. धनंजय क्षीरसागर, हर्पिंदर वीर, रघुनाथ पाटील, नौफील सय्यद, निर्मला म्हात्रे, शशिकला सिंघ, बाळकृष्ण घरत व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: CAA, protest against NRC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.