शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

सानपाडावासीयांचे सिडकोला साकडे

By admin | Published: June 25, 2017 4:16 AM

सानपाडा सेक्टर-३0मध्ये उद्यान आणि विरंगुळा केंद्राचा अभाव आहे. खेळासाठी मोकळी मैदाने आरक्षित केलेली नाहीत. वापराविना पडून

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : सानपाडा सेक्टर-३0मध्ये उद्यान आणि विरंगुळा केंद्राचा अभाव आहे. खेळासाठी मोकळी मैदाने आरक्षित केलेली नाहीत. वापराविना पडून असलेल्या भूखंडांवर अतिक्रमण झाले आहे. तर काही ठिकाणी डेब्रिजचे ढीग पडले आहेत. या पार्श्वभूमीवर येथील रहिवाशांनी सोमवारी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन दिले.सानपाडा सेक्टर-३0मध्ये जवळपास पाच हजारांची लोकवस्ती आहे. ही संपूर्ण वसाहत सायन-पनवेल महामार्गाला लागून आहे. त्यामुळे या परिसरात नेहमीच ध्वनिप्रदूषणाचा त्रास जाणवतो. विशेष म्हणजे, वसाहत निर्माण करताना या परिसरात खेळाचे मैदान, उद्यान व विरंगुळा केंद्राचे कोणतेही नियोजन करण्यात आले नाही. त्यामुळे येथील ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची मोठी अडचण होत आहे. सानपाडा रेल्वे स्थानकाच्या शेजारी रेल्वेमार्गालगत एक हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचा मोकळा भूखंड आहे. गेली अनेक वर्षे हा भूखंड वापराविना पडून आहे. त्यामुळे त्यावर मोठ्या प्रमाणात डेब्रिज पडले आहे. तसेच समोरच असलेल्या एका हॉटेलचालकाने या भूखंडाला तारेचे कुंपण लावून त्याचा वापर सुरू केला आहे. या भूखंडावर एखादे विरंगुळा केंद्र किंवा उद्यान विकसित करावे, अशी मागणी सेक्टर-३0 येथील शिवशंभो रहिवासी व्यापारी वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने केली जात आहे. त्यासाठी मागील दोन वर्षांपासून संबंधित प्राधिकरणाकडे पाठपुरावा सुरू आहे; परंतु कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर गुरुवारी स्थानिक नगरसेविका फशीबाई करसन भगत यांच्या नेतृत्वाखाली येथील रहिवाशांनी सिडकोवर धडक मारली. महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दशरथ भगत व असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भगत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सह व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. या परिसरात एकही विरंगुळा केंद्र आणि उद्यान नसेल, तर ही गंभीर बाब आहे. त्यादृष्टीने नक्कीच सकारात्मक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन चव्हाण यांनी या वेळी शिष्टमंडळाला दिले.