सोडतीदरम्यान सिडकोत रंगले मानापमान नाट्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 03:12 AM2018-10-03T03:12:58+5:302018-10-03T03:13:35+5:30

निमंत्रणाचा वाद : विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची पाठ; युनियनच्या पदाधिकाऱ्यांचीही दांडी

Cadkot Maneamam Drama during Leo | सोडतीदरम्यान सिडकोत रंगले मानापमान नाट्य

सोडतीदरम्यान सिडकोत रंगले मानापमान नाट्य

Next

कमलाकर कांबळे

नवी मुंबई : सिडकोच्या मेगागृहप्रकल्पाची मंगळवारी सोडत संपन्न झाली, त्यासाठी सिडकोने प्रथमच सगंणकीय प्रणालीचा अवलंब केला. सोडतीची प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडली असली, तरी कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून मात्र सिडकोत वेगळेच नाट्य रंगले आहे. याचा परिणाम म्हणून सिडकोच्या अनेक वरिष्ठ अधिकाºयांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. सिडकोच्या इतिहासात असा मानापमानाचा प्रकार पहिल्यांदाच घडल्याने अधिकारी वर्गात तर्क-वितर्क लावले जात आहेत.

सिडकोच्या माध्यमातून आर्थिक व अल्प उत्पन्न गटासाठी १४ हजार ८३८ घरांचे काम सुरू करण्यात आले आहे. या योजनेतील घरांसाठी मंगळवारी सिडको भवनमध्ये सोडत काढण्यात आली. या सोडतीची संपूर्ण जबाबदारी पणन विभागाची होती; परंतु या विभागाच्या ‘एकला चलो रे’ भूमिकेचा फटका कार्यक्रमाच्या नियोजनाला बसला. ज्या विभागाचा कार्यक्रम असेल, त्या विभागाकडून संबंधित व इतर विभाग अधिकाºयांना निमंत्रण देणे ही सिडकोची आजपर्यंतची परंपरा आहे; परंतु मंगळवारच्या कार्यक्रमाने या परंपरेला छेद दिल्याचे दिसून आले आहे. पणन विभागाकडून कार्यक्रमाच्या दिवसापर्यंत एकाही वरिष्ठ अधिकाºयाला निमंत्रण दिले गेले नाही. इतकेच नव्हे, तर या गृहप्रकल्पाशी संबंधित नियोजन आणि अभियंता विभागालाही विश्वासात घेतले गेले नसल्याचे समजते. याचा परिणाम म्हणून मोठा गाजावाजा झालेल्या या गृहप्रकल्पाच्या सोडतीला वरिष्ठ अधिकाºयांनी अनुपस्थिती दर्शविली. तसेच युनियनचे पदाधिकारीही गैरहजर राहिले होते. विशेष म्हणजे, मुख्य दक्षता अधिकारी विनय कारगांवकर, सहव्यवस्थापकीय संचालक अशोक शिनगारे यांनीही कार्यक्रमाला येणे टाळले. खासदार व स्थानिक आमदारांना कार्यक्रमाचे निमंत्रण देण्याचा सिडकोत पायंडा आहे. मात्र, त्यालाही या वेळी खो दिल्याचे दिसून आले आहे.

व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभाग प्रमुखांना विश्वासत घेवूनच कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती. कार्यक्रमाची जबाबदारी पणन आणि जनसंपर्क विभागावर होती. त्यानुसार अगदी नियोजनबध्द पध्दतीने सोडत प्रक्रिया पार पडली.
- लक्ष्मीकांत डावरे, पणन व्यवस्थापक, सिडको

जनसंपर्क विभागाच्या मर्यादा
या कार्यक्रमाच्या माध्यमातून सिडकोच्या जनसंपर्क विभागाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. विविध टप्प्यावर या विभागाचा अनुभव कमी पडत असल्याचे पाहावयास मिळाले. वास्तविकपणे बाह्य पाहुण्यांना निमंत्रित करण्याची जबाबदारी जनसंपर्क विभागाची असते. शिवाय, कार्यक्रमाच्या वेळी पाहुण्यांचे चहापान आणि इतर सुविधा पुरविण्याचे कामही जनसंपर्क विभागामार्फत होते. प्रोटोकॉल जपण्याची मोठी जबाबदारी या विभागाला हाताळावी लागते. दुर्दैवाने मंगळवारच्या सोडती दरम्यान, या सर्व गोष्टींचा प्रकर्षाने अभाव जाणवला.

Web Title: Cadkot Maneamam Drama during Leo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.