ड्रग्ज माफियांविरोधातील मोहीम तीव्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 04:08 AM2017-08-06T04:08:46+5:302017-08-06T04:08:50+5:30
अमली पदार्थमुक्त नवी मुंबई मोहिमेला गती येऊ लागली आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने एका वर्षामध्ये तब्बल ३४ गुन्हे दाखल करून, ४४ माफियांना गजाआड केले आहे.
- नामदेव मोरे
नवी मुंबई : अमली पदार्थमुक्त नवी मुंबई मोहिमेला गती येऊ लागली आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने एका वर्षामध्ये तब्बल ३४ गुन्हे दाखल करून, ४४ माफियांना गजाआड केले आहे. गांजासह, चरस, ब्राउन शुगर, केटामाइन, एमडी पावडर व सापाचे विषही जप्त करून, तस्करी करणाºयांचे कंबरडे मोडले आहे.
स्मार्ट सिटीच्या दिशेने नवी मुंबई, पनवेलची वाटचाल सुरू आहे. झपाट्याने होणाºया विकासाबरोबर गुन्हेगारीचे प्रमाण व स्वरूपही बदलू लागले आहे. आयटी उद्योगांचे जाळे, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, ठाणे-बेलापूर व तळोजा औद्योगिक वसाहतीसह जेएनपीटी बंदरामुळे लाखो नागरिकांना या परिसरामध्ये रोजगार मिळाला आहे. उच्च शिक्षण देणाºया संस्थांची संख्याही मोठ्या प्रमाणात असून, देशाच्या कानाकोपºयातून विद्यार्थी येथे शिक्षण घेण्यासाठी येत आहेत. आयटीसह कारखान्यांमधील कामगारांना व विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या विळख्यात ओढण्यासाठी माफियांनीही या परिसरावर लक्ष केंद्रित केले आहे. एका वर्षापूर्वी खुलेआम सर्वत्र गांजाची विक्री होत होती. एमडी पावडर, चरस, ब्राउन शुगर, केटामाइन विक्रीचे प्रमाणही वाढले होते. तरुणाई व्यसनांच्या विळख्यात अडकू लागली होती. अमली पदार्थांच्या विळख्यातून शहरवासीयांना सोडविण्यासाठी पोलीसआयुक्त हेमंत नगराळे यांनी एका वर्षापूर्वी अमली पदार्थविरोधी पथकाची निर्मिती केली. याशिवाय प्रत्येक पोलीस स्टेशनमधील अधिकाºयांना ड्रग्जमाफियांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी धाडसत्र सुरू केले व एका वर्षामध्ये माफियांचे कंबरडे मोडण्यात मोठ्या प्रमाणात यश मिळविले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरामधील बहुतांश गांजा अड्डे बंद झाले आहेत. हरीभाऊ विधाते उर्फ टारझन सारख्या गांजामाफियाचा व्यवसाय एपीएमसीमध्ये स्थलांतर झाल्यानंतर कधीच बंद झाला नव्हता; परंतु कडक कारवाईमुळे त्याचा अड्डा एका वर्षापासून पूर्णपणे बंद आहे.
कारवाईमध्ये सहभागी अधिकारी-कर्मचारी
वरीष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, पोलीस निरीक्षक स्मिता जाधव, पोलीस उपनिरीक्षक अजिम गोळे, राणी काळे, संजय चौधरी, सलीम इनामदार, इकबाल शेख, संतोष गायकवाड, कासम पिरजादे, रमेश उटगीकर, संजयसिंग ठाकूर, अश्विनी चिपळूणकर, सचिन भालेराव, राजेश गाढवे, अमोल कर्डिले, अमोल गागरे, सुप्रिया ठाकूर, आकाश मुके, बाबासाहेब सांगोळकर चांगले काम करत आहेत. यापूर्वीच्या पोलीस निरीक्षक माया मोरे, अमित शेलार व इतर कर्मचाºयांनीही चांगले काम केले होते.
चरस, ब्राउन शुगरसह केटामाइनही जप्त
तुर्भेनाका, हनुमाननगरमधून नोव्हेंबर २०१६ला पोलिसांनी मुन्नी जुम्मा शेख या महिलेला अटक केली. तिच्याकडून ६८४ ग्रॅम वजनाचे ब्राउन शुगर जप्त करण्यात आले आहे. सप्टेंबर २०१६मध्ये मुंबईतील अॅन्टॉप हिल येथे राहणाºया शन्नू रमजान शेखला अटक करून, तिच्याकडून २ लाख १४ हजार रुपये किमतीचे ८५ ग्रॅम वजनाचे केटामाइन जप्त करण्यात आले. कोपरखैरणेमधील पूनम अॅन्थोनीला अटक करून तिच्याकडून १०० ग्रॅम वजनाचे चरस जप्त करण्यात आले.
गांजा विक्रीच्या
१६ अड्ड्यांवर छापे
अमली पदार्थ विरोधी पथकाने २०१६मध्ये तळोजामध्ये पहिला छापा मारला. आझाद रामजी सिंह व राजाराम दत्तू कडू या दोघांना अटक करून त्यांच्याकडून अनुक्रमे २ किलो ३०० ग्रॅम व ५ किलो १०० ग्रॅम गांजा हस्तगत केला. एपीएमसी परिसरामध्ये पप्पू साजीद खान उर्फ बाबू लोहार, काशीनाथ रामा भोईरकडे ८ किलो ३३५ गांजा हस्तगत केला. राणी रवि दोसब, खिडुकपाडा शेवंतीबाई बाळाराम उलवेकर, हरीदास विठ्ठल विधाते उर्फ टारझन, दिलीप विनोद भोमिक, विशाल लक्ष्मण घोडे, दत्ता सीताराम सावंत, वंदना भोईर, रामचंद्र ईश्वर दास, प्रभुदया मिठ्ठू साहनी, कमलाकर काशीनाथ गायकवाड, सीताबाई संतोष इंगळे व कालिंदा उर्फ कविता हिरा कराळे हिला अटक केली आहे.
एमडी पावडरचे
९ गुन्हे
आयुक्तालयाची स्थापना झाल्यानंतर एमडी पावडर विक्रीचे सर्वाधिक ९ गुन्हे गत एका वर्षामध्ये दाखल झाले असून, ५८ लाख १४ हजार रुपये किमतीची एमडी पावडर जप्त केली आहे.
रबाळे पोलीस स्टेशनच्या हद्दीतून राफे उर्फ रफिक कदीर खान व आरफात शकील काझी या दोघांना सप्टेंबर २०१६मध्ये अटक करून, १७५ ग्रॅम वजनाची एमडी पावडर जप्त केली.
सीबीडीमध्ये शन्नू रमजान शेखकडून १२७ ग्रॅम मेथॅक्युलोन (आईस रॉक) जप्त केले. कोपरखैरणेमधून बेन्समिन चिबुके इमॅन्युअल या नायजेरीयन नागरिकाकडून २२ ग्रॅम एमडी पावडर, नेरुळमधून अझिथा बेगम अब्दुल मुथलिफ शेख कडून ३० लाख रुपये किमतीचे मॅफेड्रिन हस्तगत केले.
बिलाल उर्फ सलमान अब्दुल रज्जाक पटेलकडून ५३ ग्रॅम, फरमान जहुर सैनकडून १५१ ग्रॅम, मोहम्मद साबीर मोहम्मद याकुब शेखकडून ६० ग्रॅम, शोयेब हनिफ खानकडून १०० ग्रॅम, युगोचुकू जॉन नेयाडी या नायजेरीयनकडून २५ ग्रॅम, गॅरी ओकाफोरकडून १७८ ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात यश मिळविले आहे.
एका वर्षापूर्वी अमली पदार्थ विरोधी पथकाची निर्मिती करण्यात आली. पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त, उपआयुक्तांसह सर्व वरिष्ठांनी विश्वास दाखविला. सर्व टीमने मेहनत घेऊन वर्षभर चांगले काम करण्याचा प्रयत्न केला. अमली पदार्थ विक्री करणाºया अनेक आरोपींना गजाआड करण्यात यश मिळाले आहे.
- विनोद चव्हाण,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
अमली पदार्थ विरोधी पथक