शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

अमली पदार्थांविरोधात मोहीम

By admin | Published: September 28, 2016 3:05 AM

अमली पदार्थमुक्त नवी मुंबई करण्याचा निर्धार पोलीस आयुक्तांनी केला असून त्यासाठी स्वतंत्र पथक तयार केले आहे. पथकातील उपनिरीक्षक राणी काळे यांची कामगिरीही लक्षवेधी

नवी मुंबई : अमली पदार्थमुक्त नवी मुंबई करण्याचा निर्धार पोलीस आयुक्तांनी केला असून त्यासाठी स्वतंत्र पथक तयार केले आहे. पथकातील उपनिरीक्षक राणी काळे यांची कामगिरीही लक्षवेधी ठरू लागली आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गांजा, एम. डी. पावडर, केटामाईन व मेथॅक्युलोनची तस्करी करणाऱ्या आरोपींना गजाआड केल्यामुळे अनेक माफियांचे धाबे दणाणले आहे. अँटॉप हिलमध्ये राहणाऱ्या शन्नो रमजान शेख या महिलेला नवी मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाने २५ सप्टेंबरला अटक केली. तिच्याकडे केटामाईन पावडर व मेथॅक्युलोन (आईस रॉक) या घातक अमली पदार्थाचा साठा सापडला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये त्याची किंमत जवळपास एक कोटी रुपये आहे. सीबीडीमध्ये ही महिला सापडली असली तरी तिला अटक करण्यासाठी पोलिसांना अनेक दिवस पाळत ठेवावी लागली होती. आयुक्त, उपआयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, पोलीस निरीक्षक माया मोरे यांनी ही जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक राणी काळे यांच्यावर सोपविली होती. काळे यांनी अनेक दिवस बारबाला म्हणवून घेत पाळत ठेवण्यास सुरवात केली होती. नवी मुंबईसह भिवंडी व इतर ठिकाणी जावूनही तिच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते. अखेर केटामाईन विकणाऱ्या महिलेची माहिती काढण्यात यश आले व सीबीडीमध्ये विक्री करत असताना तिला रंगेहाथ पकडण्यात आले. नवी मुंबईमध्ये दहा वर्षांत प्रथमच एवढे घातक अमली पदार्थ जप्त केले आहे. या कारवाईमुळे अमली विरोधी पथकावर व राणी काळे यांच्यावरही कौतुकाचा वर्षाव होत आहे. २०११ मध्ये पोलीस उपनिरीक्षक झाल्यानंतर त्यांनी पुणे येथे निर्भय अभियान राबविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. महिलांशी संबंधित अनेक गुन्ह्यांचा यशस्वी तपास केला होता. पोलीस आयुक्तांनी अमली पदार्थ विरोधी पथकाची निर्मिती केल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अमित शेलार यांच्याबरोबरच राणी काळे यांनी लक्षवेधी कामगिरी केली आहे. ११ सप्टेंबरला रबाळे एमआयडीसीमध्ये एम. डी. पावडर विकणाऱ्या रफिक कादिर खान या आरोपीला त्यांनी अटक केली असून त्याच्याकडून पाच लाख रुपये किमतीचे १७५ ग्रॅम एम. डी. पावडर जप्त केली होती. तळोजामध्ये धाड टाकून तब्बल ८ किलो गांजा हस्तगत करून काशिनाथ भोईर या आरोपीलाही अटक करण्यात यश मिळविले होते. एपीएमसी परिसरात दोन दशकांपासून दबदबा असलेला गांजा माफिया अशोक पांडेला व बेलापूरमध्ये विशाल घोडे यालाही गांजा विकताना अटक केली आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने तीन महिन्यात विक्रमी कारवाई केली आहे. या यशस्वी टीमचा भाग असलेल्या राणी काळे यांच्या नावाचा दबदबा निर्माण झाला असून अनेक माफियांनी त्यांचे व्यवसाय बंद करून शहरातून पळ काढला आहे. (प्रतिनिधी)चव्हाण, मोरे यांचे मार्गदर्शन आयुक्तांनी जूनमध्ये अमली पदार्थ विरोधी पथक स्थापन करून त्याची जबाबदारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्याकडे सोपविली. चव्हाण व पोलीस निरीक्षक माया मोरे यांनी अल्पावधीमध्ये विशेष पथकामध्ये चांगली कामगिरी करण्यासाठीचा आत्मविश्वास निर्माण केला. मोरे यांनी नवी मुंबईमधील एम. डी. पावडरची पहिली कामगिरी केली होती. एपीएमसीमधील सर्व गांजाचे अड्डे बंद केले होते. अमली पदार्थांच्या विळख्यातून नवी मुंबई मुक्त करण्यासाठी त्यांनी जनजागृती मोहीमही राबविण्यास सुरवात केली असून अमित शेलारसह राणी काळे यांनाही चांगले काम करण्यासाठी प्रेरित केले आहे. उपआयुक्तांसह सर्वच वरिष्ठ व सहकारी यांच्या समन्वयामुळे तीन महिन्यात विक्रमी कारवाई होवू शकली आहे. तीन महिन्यातील कारवाई-आॅगस्टमध्ये तळोजामध्ये धाड टाकून ८ किलो गांजा जप्त, काशिनाथ भोईरला अटक -पनवेल पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये धाड टाकून राणी दोसब हिला अटक करून ३२५ ग्रॅम गांजा हस्तगत-३० आॅगस्टला एपीएमसीमधून गांजा माफिया अशोक पांडेला अटक -बेलापूर टाटा नगर झोपडपट्टीमध्ये विशाल घोडेला अटक करून गांजा जप्त-११ सप्टेंबरला रबाळे एमआयडीसीमधून १७५ ग्रॅम एम.डी. पावडरसह रफिक कादिर खानला अटक -२५ सप्टेंबरला मेथ्यॅक्युलोनसह केटामाईन पावडरसह शन्नो शेखला अटक