हुक्का पार्लरविरोधात शहरात मोहीम तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 02:27 AM2017-08-04T02:27:36+5:302017-08-04T02:27:36+5:30

हुक्का पार्लर चालविणाºयांविरोधात पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे. दोन दिवसांमध्ये ४ ठिकाणी छापा टाकला आहे. एक वर्षामध्ये ८ हुक्का पार्लरवर कारवाई केली असून, तब्बल ६७ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

 Campaigns in the city against the Hukka Parlors intensified | हुक्का पार्लरविरोधात शहरात मोहीम तीव्र

हुक्का पार्लरविरोधात शहरात मोहीम तीव्र

Next

नामदेव मोरे ।
नवी मुंबई : हुक्का पार्लर चालविणाºयांविरोधात पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे. दोन दिवसांमध्ये ४ ठिकाणी छापा टाकला आहे. एक वर्षामध्ये ८ हुक्का पार्लरवर कारवाई केली असून, तब्बल ६७ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
डान्स बार सुरू होण्यामधील अडचणी व महामार्गानजीकच्या बारवर सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या बंदीमुळे पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये अनधिकृतपणे हुक्का पार्लर सुरू करण्यात आले आहेत. तरुणाईला आकर्षित करण्यासाठी हुक्का पार्लरच्या मालकांनी सोशल मीडियामधून जाहिराती सुरू केल्या आहेत. हुक्का पार्लरमधील व्हिडीओ इंस्टाग्राम, फेसबुक व इतर सोशल मीडियावरून पाठविले जात आहेत. तरुणाईला व्यसनांच्या जाळ्यात अडकविले जात आहे. अकरावी व बारावीमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थीही हुक्का ओढत असल्याचे चित्र पाहावयास मिळू लागले होते. याविषयी सामाजिक कार्यकर्त्यांनीही तक्रारी सुरू केल्या होत्या. ‘लोकमत’ने याविषयी स्टिंग आॅपरेशन करून वास्तव समोर आणले होते. वास्तविक हुक्का पार्लरवर कारवाई करणे फक्त पोलिसांची जबाबदारी नसून महापालिका व अन्न व औषध प्रशासनाचीही तितकीच जबाबदारी होती. पण त्यांच्याकडून कारवाई केली जात नसल्याने अमली पदार्थ विरोधी पथकाने बेकायदेशीर हुक्का पार्लरविरोधात मोहीम हाती घेतली आहे.
अमली पदार्थ विरोधी पथकाने एक वर्षामध्ये तब्बल ८ ठिकाणी छापा टाकला आहे. आतापर्यंत ६७ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. १ व २ आॅगस्टला चार ठिकाणी कारवाई केली असून १८ जणांवर गुन्हे दाखल केले. कारवाईमुळे अवैधपणे व्यवसाय करणाºयांचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांनी पार्लरबरोबर हुक्का ओढणाºयांवरही कारवाई सुरू केली आहे. यापुढे शहरात कुठेही अवैधपणे व्यवसाय होत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रमुख विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता जाधव, अजिम गोळे, राणी काळे, संजय चौधरी, सलीम इनामदार, इकबाल शेख, संतोष गायकवाड, कासम पिरजादे, रमेश उटगीकर, संजयसिंग ठाकूर, अश्विनी चिपळूणकर, सचिन भालेराव, राजेश गाढवे, अमोल कर्डीले, अमोल गागरे, सुप्रिया ठाकूर, आकाश मुके व बाबासाहेब सांगोळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Web Title:  Campaigns in the city against the Hukka Parlors intensified

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.